Amravati Division Graduate Constituency : अमरावती पदवीधरमध्ये रणजीत पाटील की लिंगाडे! घटलेल्या मतदानाचा फटका कोणाला?
निवडणुकीत 23 उमेदवार रिंगणात असल्याने चुरशीच्या लढतीमध्ये भाजपचे डॉ. रणजीत पाटील विजयाची हॅटट्रिक मारतात का? की लिंगाडे पाटील यांची विजयी घोडदौड रोखण्यात यशस्वी होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
![Amravati Division Graduate Constituency : अमरावती पदवीधरमध्ये रणजीत पाटील की लिंगाडे! घटलेल्या मतदानाचा फटका कोणाला? Who is affected by the reduced voter turnout in Amravati graduate Constituency Ranjit Patil or Lingade Amravati Division Graduate Constituency : अमरावती पदवीधरमध्ये रणजीत पाटील की लिंगाडे! घटलेल्या मतदानाचा फटका कोणाला?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/02/69378fdcf48486d05d6efa65ca72935c1675322387835440_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Graduate Constituency Amravati Division : अमरावती (Amravati) विभाग पदवीधर मतदारसंघासाठी मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर आता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पाच जिल्ह्यांत विखुरलेल्या अमरावती विभागासाठी यंदा सुमारे 13.5 टक्के मतदान कमी झाले. त्यामुळे या कमी झालेल्या मतदानाचा फटका कोणाला बसणार? याबद्दल तर्क लढवण्यात येत आहे.
बॅलेट बॉक्स काढून गठ्ठे केल्यानंतर दुपारी दोन वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पाच वाजेपर्यंत कल हाती येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मतमोजणीमध्ये उमेदवाराला विजयासाठी पहिल्या पसंतीची मते न मिळाल्यास बाद फेरीचा आधार घ्यावा लागणार आहे. ही प्रक्रिया क्लिष्ट असल्याने मतमोजणी आणि त्यानंतर निकाल जाहीर होण्यास उशीर लागेल. या निवडणुकीत 23 उमेदवार रिंगणात असल्याने चुरशीच्या लढतीमध्ये भाजपचे डॉ. रणजीत पाटील (Ranjit Patil) विजयाची हॅटट्रिक मारतात का? की कॉंग्रेसचे धीरज लिंगाडे पाटील यांची विजयी घोडदौड रोखण्यात यशस्वी होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
...तर सर्वात कमी मते मिळालेला उमेदवार होणार बाद
आज सकाळी बडनेरा येथील नेमाणी गोदामामध्ये मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. मतमोजणीसाठी 28 टेबल लावण्यात आलेले आहेत. या टेबलांवर प्रत्येकी एक हजार मतपत्रिका मोजणीसाठी देण्यात येणार आहेत. म्हणजेच एका फेरीमध्ये 28 हजार मते मोजली जातील. या सर्व मतपत्रिका पिजन होलमध्ये ठेवल्या जातील. अशा पद्धतीने विजयाचा कोटा पूर्ण होईपर्यंत प्रक्रिया सुरू राहील.वैध मतांमध्ये विजयाचा कोटा पूर्ण न झाल्यास ज्या उमेदवाराला सर्वांत कमी मते मिळाली, त्याला बाद करण्यात येईल व त्याच्या मतपत्रिकेवरील दुसऱ्या क्रमांकाची मते मोजली जाणार आहेत. विजयी मतांचा कोटा पूर्ण होईपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील. मतमोजणीसाठी पाचही जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व इतरांची नियुक्ती करण्यात आली आहे.
23 उमेदवारांमुळे मतविभाजन
या मतदारसंघात सलग दोन वेळा प्रतिनिधित्व करणारे भाजपचे उमेदवार डॉ. रणजीत पाटील, कॉंग्रेसचे उमेदवार धीरज लिंगाडे, वंचित बहुजन आघाडीचे प्रा. अनिल अमलकार, शरद झांबरे, काँग्रेसचे बंडखोर श्याम प्रजापती, अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांच्यासह 23 उमेदवारांनी भविष्य अजमावल्याने त्यांच्यापैकी कोण विजयी होते व कोणता उमेदवार कोणाच्या विजयाची गणित बिघडवते, हे आज कळणार आहे.
घटलेल्या मतदानाचा फटका कुणाला?
पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मतदानाच्या दिवशी पाचही जिल्ह्यात संथ गतीने मतदान झाले. त्यामुळे एकूण केवळ 49.67 टक्केच मतदान होऊ शकले. अकोला तर केवळ जिल्ह्यात 46.91 टक्के मतदान झाले. निवडणुकीत मतदान घटल्याने त्याचा फायदा दोन वेळचे विजयी उमेदवार डॉ. रणजीत पाटील यांना होतो की त्यांच्या विजयाचे गणित बिघडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कॉंग्रेसचे धीरज लिंगाडेसुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याने त्यांना तीन राजकीय पक्षाच्या मतदारांचे बळ मिळाल्याने त्यांचे पारडेसुद्धा जड असल्याचे बोलले जात आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Teachers Constituency Election : गाणार यांची हॅट्रीक की परिवर्तन होणार? शिक्षक मतदार संघ निवडणुकीचा आज निकाल
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)