एक्स्प्लोर

Uddhav Thackeray:'बघू देवाच्या मनात असेल तर तेही होईल' मुंबई महापौरपदाबाबत मातोश्रीवरुन उद्धव ठाकरे यांचं मोठं वक्तव्य! नेमकं काय म्हणाले?

Uddhav Thackeray: मुंबईतील नवनिर्वाचित नगरसेवकांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे म्हणाले की यशाचे मानकरी तुम्ही सगळे आहात. आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत.

Uddhav Thackeray: आपल्यामध्ये आणि भाजपमध्ये खूप फरक आहे. त्यांना वाटतं की कागदावरची शिवसेना त्यांनी संपवली, पण जमिनीवरची शिवसेना ते कधीच संपवू शकत नाहीत. कारण ते कधी जमिनीवर राहू शकत नसल्याचा खणखणीत टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला. मातोश्रीवर बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटासह भाजपवर हल्लाबोल केला. मुंबईतील नवनिर्वाचित नगरसेवकांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे म्हणाले की यशाचे मानकरी तुम्ही सगळे आहात. आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत. जो निकाल या सगळ्या परिस्थितीमध्ये लागला तो अभिमानास्पद असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांनी सांगितले की साम दाम दंड भेद यंत्रणेचा दुरुपयोग करून सगळं काही केलं. गद्दार निघून गेले मात्र ते निष्ठा विकत घेऊ शकले नाहीत. मी सगळ्यांना मानाचा मुजरा करतो आणि जबाबदार आपली वाढली असल्याचं ठाकरे यांनी नमूद केलं. 

देवाच्या मनात असेल तर तेही होईल 

उद्धव यांनी पुढे सांगितले की आपला महापौर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहे. देवाच्या मनात असेल तर तेही होईल असं सूचक विधान सुद्धा उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं. त्यांनी पुढे सांगितले की, गद्दारी करून त्यांनी विजय मिळवला आहे तो मुंबई गहाण ठेवण्यासाठीच असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. ते म्हणाले की या पापाला मराठी माणूस कधी क्षमा करणार नाही. मात्र, तुम्ही अभिमानाने लढला, तुम्ही निष्ठेसाठी लढला त्यामुळे तुमचा अभिमान असल्याचे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले की जेव्हा मी फिरत होतो त्यावेळी कोणत्याही सोयी सुविधा आपण देऊ शकलो नाही. आपल्याकडे तन मन त्यांच्याकडे फक्त धन आहे. आपण शक्तीच्या बळावर त्यांना घाम फोडल्याचे त्यांनी सांगितले. ही शक्ती अशीच एकत्र ठेवा पुढच्या पिढ्याला सुद्धा तुमचा अभिमान वाटेल असेही ठाकरे यावेळी म्हणाले. ते म्हणाले की यश मी तुमच्या चरणी नतमस्तक होऊन विजयाच्या श्रेय तुम्हाला देत आहे. ही लढाई संपलेली नाही, जिद्द महत्त्वाची आहे आणि ती कोणीही विकत घेऊ शकत नाही. जिद्दीच्या जोरावर आपण परत जिंकू असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. 

इतर महत्वाच्या बातम्या

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती

सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास

Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा

लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा

भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन

Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Embed widget