एक्स्प्लोर

लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात देशभरातील 51 जागांवर सरासरी 62.46 टक्के मतदानाची नोंद

पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 74.42 टक्के तर काश्मीरमध्ये सर्वात कमी 17.07 टक्के मतदान नोंदवण्यात आलं आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात आज सोमवारी 7 राज्यांतल्या 51 जागांवर मतदान पार पडलं आहे. दिवसअखेर या 51 जागांवर सरासरी 62.46 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. रायबरेलीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, तर अमेठीत राहुल गांधी आणि स्मृती इराणींमध्ये अटीतटीची लढत आहे. त्यामुळे आज मतदारराजाने कुणाला कौल दिलाय हे 23 मे रोजीच कळणार आहे. मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावत 674 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला ईव्हीएममध्ये बंद केला आहे. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 74.42 टक्के तर काश्मीरमध्ये सर्वात कमी 17.07 टक्के मतदान नोंदवण्यात आलं आहे. सात राज्यांतील सरासरी आकडेवारी बिहार 57.76 % जम्मू आणि काश्मीर 17.07 % झारखंड 64.60 % मध्य प्रदेश 64.61 % राजस्थान 63.69 % उत्तर प्रदेश 57.06 % पश्चिम बंगाल 74.42 % दिग्गजांचं मतदान क्रिकेटपटू महेंद्र सिंह धोनीने पत्नी साक्षीसोबत रांचीच्या जवाहर विद्या मंदिरमध्ये मतदान केलं. तर अभिनेता आशुतोष राणा यांनी मध्य प्रदेशच्या नरसिंहपूरमध्ये मतदानाचा हक्क बजावला. बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनीही लखनौमध्ये मतदान केलं, तर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही सहकुटुंब जयपूरच्या टागोर शाळेत मतदान केलं. माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी पत्नीसह हजारीबगेत मतदानाचा हक्क बजावला. भाजपच्या राजनाथ सिंह, राजवर्धन राठोड, जयंत सिन्हा यांचं भवितव्यही आज ईव्हीएमध्ये बंद झालं आहे. तर लखनौमध्ये राजनाथ सिंह यांच्या विरोधात समाजवादी पक्षाच्या उमेदवार आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पूनम सिन्हा यांचं आव्हान आहे. अमेठीत बूथ कॅप्चरिंगचा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर गंभीर आरोप केले आहेत. अमेठीतून गायब असलेले राहुल गांधी आज मतदान केंद्र बळकावण्यासाठी आल्याचा गंभीर आरोप त्यांनी राहुल गांधींवर केलाय. एका वृद्ध महिलेचा व्हिडीओही त्यांनी ट्वीट केला आहे. अमेठीत राहुल गांधी आणि स्मृती इराणी यांच्यात लढत होत आहे. पश्चिम बंगाल आणि काश्मीरमध्ये मतदानावेळी राडा पाचव्या टप्प्यात मतदानावेळी पश्चिम बंगालच्या बैरकपूर आणि हावडामध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. यात भाजपचे उमेदवार अर्जुन सिंह जखमी झाले आहेत. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी बूथ बळकावल्याचा आरोप केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. दुसरीकडे काश्मीरच्या पुलवामामध्येही मतदान केंद्रावर ग्रेनेड हल्ला करण्यात आला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar on Someshwar Sugar Factory Election Result : निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
Someshwar Factory Election: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
Vidhan Parishad Election : पुण्यामध्ये भाजप महायुतीचा प्रचार नारळ फुटला! रविंद्र चव्हाणांच्या दौऱ्याने कार्यकर्त्यांत उत्साह; जुन्या पेन्शन संघटनेचा उघड पाठिंबा
पुण्यामध्ये भाजप महायुतीचा प्रचार नारळ फुटला! रविंद्र चव्हाणांच्या दौऱ्याने कार्यकर्त्यांत उत्साह; जुन्या पेन्शन संघटनेचा उघड पाठिंबा
सोमेश्वर साखर कारखान्याची निवडणूक एकतर्फी, 21 पैकी 21 जागा जिंकण्याचा प्रयत्न, खासदार पार्थ पवारांना विश्वास 
सोमेश्वर साखर कारखान्याची निवडणूक एकतर्फी, 21 पैकी 21 जागा जिंकण्याचा प्रयत्न, खासदार पार्थ पवारांना विश्वास 

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar on Someshwar Sugar Factory Election Result : निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
Someshwar Factory Election: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
WCL 2026 : 6 चेंडू, 12 धावा अन् काळजाचा ठोका चुकवणारा ड्रामा! भारत-बांगलादेश मॅचचा थरारक शेवट, ज्याने सगळेच चक्रावले
6 चेंडू, 12 धावा अन् काळजाचा ठोका चुकवणारा ड्रामा! भारत-बांगलादेश मॅचचा थरारक शेवट, ज्याने सगळेच चक्रावले
Abhijeet Dipke: आजीला शेवटचं पाहता आलं नाही, चितेपाशी जाताच अभिजीत दिपके ढसाढसा रडायला लागले
आजीला शेवटचं पाहता आलं नाही, चितेपाशी जाताच अभिजीत दिपके ढसाढसा रडायला लागले
Abhishek Sharma World Record : अभिषेक शर्माचं वादळ आलं अन् सूर्याचा विक्रम वाहून गेला! टी-20 क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम
अभिषेक शर्माचं वादळ आलं अन् सूर्याचा विक्रम वाहून गेला! टी-20 क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम
Chanakya Niti: कधी बोलावं? कधी शांत राहावे? चाणक्यनीतीचे 6 तत्त्व जाणून घ्या, जी तुमच्या उपयोगी येतील...
कधी बोलावं? कधी शांत राहावे? चाणक्यनीतीचे 6 तत्त्व जाणून घ्या, जी तुमच्या उपयोगी येतील...
Nagpur Election 2026: अनिल सोलेंचा बंडाचा झेंडा कायम, नागपुरात भाजपची धाकधूक वाढली? मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या बड्या नेत्यांची आज कोराडीत महत्वाची बैठक
अनिल सोलेंचा बंडाचा झेंडा कायम, नागपुरात भाजपची धाकधूक वाढली? मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या बड्या नेत्यांची आज कोराडीत महत्वाची बैठक
Rohit Pawar on MPSC Protest : विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय, तुकाराम मुंडे समितीत आले, काही जागा वाढवून मिळाल्या, 14 अतिरिक्त मागण्या मान्य, आंदोलन स्थगित झाल्यानंतर रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय, तुकाराम मुंडे समितीत आले, काही जागा वाढवून मिळाल्या, 14 अतिरिक्त मागण्या मान्य, आंदोलन स्थगित झाल्यानंतर रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
Embed widget