एक्स्प्लोर

आजारी आमदारांच्या मतदानावरुन 'राजकारण' रंगलं; स्वत: आमदार अन् नातेवाईक मात्र म्हणाले...

Vidhan Parishad Election 2022 : विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी मतदान प्रक्रिया सुरु आहे. या मतदानाला भाजपकडून आजारी आमदारांना बोलावण्यावरुन शिवसेनेनं टीका केली आहे.

Vidhan Parishad Election 2022 : विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी मतदान प्रक्रिया सुरु आहे. या मतदानाला भाजपकडून आजारी आमदारांना बोलावण्यावरुन शिवसेनेनं टीका केली आहे. सामनाच्या अग्रलेखात म्हटलं की, भाजप सर्व मार्गांनी केवळ विजय मिळवण्याचा प्रयत्न करत असून यामध्ये अगदी सरकारी यंत्रणा, स्वत:च्या आजारी आमदारांना अत्यंत नाजूक स्थितीत मतदानास उचलून आणण्यासारखे प्रकार करत असल्याची टीका शिवसेनेनं केली आहे.  मलिक-देशमुखांना मतदानाची परवानगी नाही, हे भेदाभेदीचेच राजकारण. पण त्याच वेळेला लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक या दोन आजारी आमदारांना अत्यंत नाजूक स्थितीत मतदानास उचलून आणले जाते. हे दोन्ही आमदार कर्करोगाशी झुंजत आहेत. व्हेंटिलेटरवर त्यांचा श्वास आहे असे म्हणतात, पण राजकीय स्वार्थ असला की, माणुसकी तुडवून त्यांना स्ट्रेचर व व्हीलचेअरवर मतांसाठी आणले जाते. विजयाची किंवा चमत्काराची इतकीच खात्री असताना हे अमानुष, अघोरी प्रयोग कशासाठी? पण राजकीय फायद्यासाठी भाजपा कोणत्याही अमानुष थरापर्यंत घसरू शकतो. याचेच नाव चमत्कार, असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.

काय म्हणाल्या मुक्ता टिळक
भाजप आमदार मुक्ता टिळक यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की,  पक्ष आदेशानुसार आपण मतदानासाठी जात आहे. पक्षाने दिलेला आदेश पाळायचा, हे आमच्या रक्तामध्ये भिनलेलं आहे. त्यामुळे मी आज मतदानाला जात आहे. तसेच राज्यसभा निवडणुकीत आमचे उमेदवार विजयी झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बोलणे झाले. त्यावेळी त्यांनी माझे आभार मानले, असं मुक्ता टिळक यांनी सांगितलं.  पक्षातील सर्वचजण काळजी घेतात. त्यामुळे विशेष ममत्व वाटतं, असंही त्या म्हणाल्या.

भाजप आमदार लक्ष्मण जगताप ऍम्ब्युलन्सने मतदानासाठी 

राज्यसभेच्या निवडणुकीत भाजप आमदार लक्ष्मण जगतापांचे मत हे बहुमूल्य ठरले होते. आता विधानपरिषदेच्या आखाड्यात ही तशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणूनच आजारग्रस्त आमदार जगताप मतदानासाठी मुंबईला आलेत.  विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष्मण जगताप यांना तुम्ही तब्येतीची काळजी घ्या मतदानाला येऊ नका असे सांगितले होते.  मात्र तरीही लक्ष्मण जगताप मतदानाला येण्यावर ठाम होते. लक्ष्मण जगताप दुपारपर्यंत मतदानाला पोहोचतील, अशी माहिती आहे.  लक्ष्मण जगताप यांना देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी फोन करून तब्येतीची विचारपूस केली होती. जगताप यांच्यां बंधूंनी म्हटलं की, राज्यसभेच्या वेळीही पक्षानं स्पष्टपणे सांगितलं होतं की, तब्येत बरोबर नसेल तर येऊ नका. पक्षापेक्षा व्यक्ती आम्हाला महत्वाचा आहे, असं त्यांनी सांगितलं होतं. पक्षानं मतदानासाठी आग्रह केला नव्हता, असं ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलमध्ये भारताचा ऐतिहासिक 600वा कसोटी सामना; टॉसपासून प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलमध्ये भारताचा ऐतिहासिक 600वा कसोटी सामना; टॉसपासून प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलमध्ये भारताचा ऐतिहासिक 600वा कसोटी सामना; टॉसपासून प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलमध्ये भारताचा ऐतिहासिक 600वा कसोटी सामना; टॉसपासून प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
Horoscope Today 15 August 2026 : आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
Box office collection: सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
Embed widget