Vadgaon Sheri Assembly Election 2024: पोर्शे प्रकरण, शरद पवारांना नोटीस प्रकरणाचा प्रभाव नाही; वडगाव शेरी मतदारसंघात सुनील टिंगरे आघाडीवर
Vadgaon Sheri Assembly Election 2024: पुणे जिल्ह्यातील वडगाव शेरी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) उमेदवार बापू पठारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) सुनील टिंगरे यांच्यातील लढत चुरशीची होत आहे.
पुणे : आज विधानसभा निवडणुकांचा निकाल काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहेत. त्याआधी निकालाच्या फेऱ्या पार पडत आहेत, त्यामध्ये महायुतीचं पारडं काहीसं जड दिसत आहे. अशातच काही महत्त्वाच्या मतदारसंघामध्ये चुरशीची लढत झाली आहे. त्यापैकी एक म्हणजे पुणे जिल्ह्यातील वडगाव शेरी (Vadgaon Sheri) मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) उमेदवार बापू पठारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) सुनील टिंगरे (Sunil Tingre) यांच्यातील लढत चुरशीची झाली आहे. या मतदारसंघामध्ये सुनील टिंगरे 16795 मतांनी आघाडीवर आहेत. तर शरद पवारांच्या पक्षाचे उमेदवार बापू पठारे हे पिछाडीवर आहेत.
वडगाल शेरी मतदारसंघात प्रतिष्ठेच्या लढतीत कोण बाजी मारणार, याकडे मतदारांचे लक्ष लागून राहिलं आहे. आणखी मतमोजणीच्या फेऱ्या बाकी असल्या तरी सुनील टिंगरे आघाडीवर दिसून येत आहेत. या मतदरासंघामध्ये कल्याणीनगर भागातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोप, शरद पवारांना पाठवलेली नोटीस, तसेच भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले उमेदवार जगदीश मुळीक यांच्या नाराजी नाट्यानंतर वडगाव शेरी मतदारसंघ निकालाकडे सामान्यांचे लक्ष लागलं आहे.
वडगाव शेरीतील निवडणूक सुरुवातीपासून चर्चेची ठरली होती. या मतदारसंघामध्ये भाजपसह राष्ट्रवादी उमेदवारी मिळवण्यासाठी आग्रही होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांना हा मतदारसंघ मिळवला मात्र, त्यानंतर भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी जगदीश मुळीक यांनी प्रयत्न केले. त्यांना पक्षाकडून एबी फॉर्म देखील मिळाला, मात्र त्यांनी तो भरला नाही. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मुळीक यांची समजूत काढली. त्यानंतर त्यांनी महायुतीचा धर्म पाळणार असल्याचं म्हटलं होतं, त्यानंतर या मतदारसंघात कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडते हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.
निवडणुकीच्या प्रचारावेळी कल्याणीनगर भागातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोप, शरद पवारांना पाठवलेली नोटीस, ही प्रकरणे विरोधी पक्षांनी लावून धरली होती. त्यानंतर त्यांच्या मतदारसंघातील भाजपचे इच्छुक उमेदवार जगदीश मुळीक यांनी देखील टिंगरेंनी कल्याणीनगर अपघात प्रकरणावरून टीका केली होती, त्या प्रकरणांचा निवडणुकीच काहीच फरत नसल्याचं दिसून येत आहे.
2019 ला मिळालेले मताधिक्य
2019 ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) सुनील टिंगरे यांनी जिंकली. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे आमदार जगदीश मुळीक यांचा 4956 मतांच्या फरकाने पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील विजय टिंगरे हे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.