एक्स्प्लोर

Uttar Pradesh: उत्तर प्रदेशमध्ये आम्ही सरकार बनवतोय, अखिलेश यादव यांचा दावा

Uttar Pradesh: एक्झिट पोलमध्ये भाजपला सत्तेची संधी दिसत असली तरी सरकार आम्हीच बनवणार असल्याचा दावा समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादव यांनी केला.

लखनऊ: शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर भाजप आणि समाजवादी पक्षाकडून सत्ता बनवण्याचा दावा केला जात आहे. एक्झिट पोल काहीही असो उत्तर प्रदेशमध्ये सरकार आम्हीच बनवणार असा दावा आता समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी केला आहे. 

उत्तर प्रदेशातील शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडलं. त्यानंतर आलेल्या सर्व एक्झिट पोलमध्ये पुन्हा एकदा भाजप सरकार बनवणार असं सांगण्यात येतंय. त्यावर प्रतिक्रिया देताना समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी ट्वीट केलं आहे की, "सातव्या आणि निर्णायक टप्प्यामध्ये समाजवादी पक्षाच्या आघाडीला बहुमत देणाऱ्या सर्व मतदारांचे आणि विशेषत: युवा वर्गाचे आभार. आम्ही सरकार बनवतोय."

 

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा भाजपच बाजी मारणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. समाजवादीच्या अखिलेश यादव यांनी मोदी-योगींना जबरदस्त टक्कर दिली असली तरी भाजप आपली सत्ता कायम राखणार असल्याचं या पोलमधून स्पष्ट झालं आहे. एकूण 403 सदस्य संख्या असलेल्या उत्तर प्रदेश विधानसभेमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी एकूण 202 जागांची गरज आहे. भाजपला यावेळीही स्पष्ट बहुमत मिळणार तर अखिलेश यादव सत्तेपासून दूर राहणार असंच या एक्झिट पोलमधून दिसतंय. 

उत्तर प्रदेश हे भाजपसाठी महत्त्वाचं राज्य असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीमध्ये जोरदार प्रचार केला होता. त्याचा फायदा भाजपला झाल्याचं दिसून येतंय. काँग्रेसला दोन आकडी संख्याही गाठणे अवघड ठरणार आहे असं या एक्झिट पोलमध्ये सांगण्यात येतंय.

2017 साली भाजपला बहुमत
उत्तर प्रदेशमध्ये 2017 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 317 जागा, समाजवादी पक्षाला 47 जागा, बसपाला 19 जागा तर काँग्रेसला केवळ सात जागा मिळाल्या होत्या.

संबंधित बातम्या: 

 

महत्त्वाच्या बातम्या

Parbhani Crime: पत्नीचे 12.64 लाखांचे थकीत वेतन मंजूर करण्यासाठी 1.80 लाखांची लाच; एक फोन कॉल अन् सगळ्या प्रकरणाचा भांडाफोड; परभणीत लिपिकासह वरिष्ठ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
पत्नीचे 12.64 लाखांचे थकीत वेतन मंजूर करण्यासाठी 1.80 लाखांची लाच; एक फोन कॉल अन् सगळ्या प्रकरणाचा भांडाफोड; परभणीत लिपिकासह वरिष्ठ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
Mandar Kiwale Case: 'माझ्याकडे पाहा, तू वाचणार आहेस...'; जीवघेणे वार तरीही जगण्याची धडपड, कोर्टासमोर हल्ला झाल्यानंतर मंदार किवळेला त्याच्या केसमधील महिला वकिलांनीच दिलेला धीर
'माझ्याकडे पाहा, तू वाचणार आहेस...'; जीवघेणे वार तरीही जगण्याची धडपड, कोर्टासमोर हल्ला झाल्यानंतर मंदार किवळेला त्याच्या केसमधील महिला वकिलांनीच दिलेला धीर
IND vs NZ 2nd Test Day-1 : 110/1 वरून थेट 110/4! फक्त 16 चेंडूत धडाधड 3 फलंदाज OUT, न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा कमबॅक, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
110/1 वरून थेट 110/4! फक्त 16 चेंडूत धडाधड 3 फलंदाज OUT, न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा कमबॅक, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Chhatrapati Sambhajinagar : वसतिगृहात फिजिओथेरपीच्या विद्यार्थिनीने गळ्याला लावली दोर; रूममेटला कॉलेजला जाण्यासाठी नकार दिला, त्या गेल्यानंतर..., छत्रपती संभाजीनगरमधील घटना
वसतिगृहात फिजिओथेरपीच्या विद्यार्थिनीने गळ्याला लावली दोर; रूममेटला कॉलेजला जाण्यासाठी नकार दिला, त्या गेल्यानंतर..., छत्रपती संभाजीनगरमधील घटना

व्हिडीओ

No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report
Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parbhani Crime: पत्नीचे 12.64 लाखांचे थकीत वेतन मंजूर करण्यासाठी 1.80 लाखांची लाच; एक फोन कॉल अन् सगळ्या प्रकरणाचा भांडाफोड; परभणीत लिपिकासह वरिष्ठ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
पत्नीचे 12.64 लाखांचे थकीत वेतन मंजूर करण्यासाठी 1.80 लाखांची लाच; एक फोन कॉल अन् सगळ्या प्रकरणाचा भांडाफोड; परभणीत लिपिकासह वरिष्ठ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
Mandar Kiwale Case: 'माझ्याकडे पाहा, तू वाचणार आहेस...'; जीवघेणे वार तरीही जगण्याची धडपड, कोर्टासमोर हल्ला झाल्यानंतर मंदार किवळेला त्याच्या केसमधील महिला वकिलांनीच दिलेला धीर
'माझ्याकडे पाहा, तू वाचणार आहेस...'; जीवघेणे वार तरीही जगण्याची धडपड, कोर्टासमोर हल्ला झाल्यानंतर मंदार किवळेला त्याच्या केसमधील महिला वकिलांनीच दिलेला धीर
IND vs NZ 2nd Test Day-1 : 110/1 वरून थेट 110/4! फक्त 16 चेंडूत धडाधड 3 फलंदाज OUT, न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा कमबॅक, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
110/1 वरून थेट 110/4! फक्त 16 चेंडूत धडाधड 3 फलंदाज OUT, न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा कमबॅक, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Chhatrapati Sambhajinagar : वसतिगृहात फिजिओथेरपीच्या विद्यार्थिनीने गळ्याला लावली दोर; रूममेटला कॉलेजला जाण्यासाठी नकार दिला, त्या गेल्यानंतर..., छत्रपती संभाजीनगरमधील घटना
वसतिगृहात फिजिओथेरपीच्या विद्यार्थिनीने गळ्याला लावली दोर; रूममेटला कॉलेजला जाण्यासाठी नकार दिला, त्या गेल्यानंतर..., छत्रपती संभाजीनगरमधील घटना
Vasai Crime News : वसईत बहिणीनेच भावाला चाकूने भोसकून संपवलं; घरात घेण्याच्या वादातून थरार, आरोपी ताब्यात
वसईत बहिणीनेच भावाला चाकूने भोसकून संपवलं; घरात घेण्याच्या वादातून थरार, आरोपी ताब्यात
IND vs SL : पंचांच्या निर्णयांनी भारताला रडवलं! आशिया कप स्पर्धेतून बाहेर, रिंकूची वादग्रस्त विकेट ते श्रीलंकेच्या फलंदाजांवर मेहेरबानी... सेमीफायनलमध्ये नेमकं काय घडलं?
पंचांच्या निर्णयांनी भारताला रडवलं! रिंकूची वादग्रस्त विकेट ते श्रीलंकेच्या फलंदाजांवर मेहेरबानी... सेमीफायनलमध्ये नेमकं काय घडलं?
Parliament Session : 30 नोव्हेंबर रोजी लोकसभा, तर 2 डिसेंबरला राज्यसभेचे अधिवेशन; मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारकडून मोठ्या हालचाली
30 नोव्हेंबर रोजी लोकसभा, तर 2 डिसेंबरला राज्यसभेचे अधिवेशन; मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारकडून मोठ्या हालचाली
Packaged Food Label : पॅकेटबंद खाद्यपदार्थांवर 'हाय फॅट, शुगर, सॉल्ट'चा इशारा देणारा षटकोन छापा, सुप्रीम कोर्टाचे FSSAI ला मोठे निर्देश
पॅकेटबंद खाद्यपदार्थांवर 'हाय फॅट, शुगर, सॉल्ट'चा इशारा देणारा षटकोन छापा, सुप्रीम कोर्टाचे FSSAI ला मोठे निर्देश
Embed widget