Rajeshwar Singh Former ED Officer :  ईडीमध्ये कार्यरत असताना अनेक हायप्रोफाइलचा तपास करणारे माजी अधिकारी राजेश्वर सिंह हे उत्तर प्रदेशमधून भाजपच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उत्तर प्रदेशमध्ये भाजपने बहुमताचा आकडा गाठला आहे. तर, दुसरीकडे राजेश्वर सिंह यांना समाजवादी पक्षाकडून कडवं आव्हान मिळत असल्याचे चित्र आहे. राजेश्वर सिंह  हे सरोजिनी नगरमधून निवडणूक लढवत आहेत. 


राजेश्वर सिंह यांच्यासमोर समाजवादी पक्षाचे अभिषेक मिश्रा यांचे आव्हान आहे. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, राजेश्वर सिंह 14757 मते मिळाली. तर, अभिषेक मिश्रा यांना 13710 मते मिळाली आहेत. दोन्ही उमेदवारांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. भाजपसाठी हा मतदारसंघ अनुकूल समजला जात आहे. मात्र, समाजवादी पक्षाने कडवं आव्हान निर्माण केलं आहे. 


एन्काऊंटर स्पेशलिस्ट या नावाने ओळखले जाणारे राजेश्वर सिंह यांनी ईडीमध्ये कार्यरत असताना अनेक हाय प्रोफाईल केसेसची तपासणी केली आहे. एयरटेल मॅक्सिम, 2G स्पेक्ट्रम, कोळसा घोटाळा, कॉमनवेल्थ गेम्स घोटाळा, ऑगस्टा वेस्टलॅन्ड या सारख्या अनेक प्रकरणांच्या तपासामध्ये  राजेश्वर सिंह यांनी प्रमुख भूमिका बजावली आहे. राजेश्वर सिंह हे उत्तर प्रदेशातील सुलतानपूरचे रहिवासी असून त्यांनी कायदा आणि मानवाधिकार या क्षेत्रामध्ये पदवी संपादन केली आहे. एका प्रकरणामध्ये, 2018 साली राजेश्वर सिंह यांच्याविरोधात चौकशी करण्यात आली होती पण ते निर्दोष सुटले. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :