Punjab Election Result 2022 Live : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा पराभव
Punajab Election Results 2022 Live Updates : पंजाबमध्ये कोण बाजी मारणार? दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला. पाहा अचूक निकाल फक्त एबीपी माझावर...
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 10 Mar 2022 05:02 AM

पार्श्वभूमी
Punajab Election Results 2022 Live Updates : देशातील पाच महत्त्वाच्या राज्यातील निवडणुकांचा निकाल अवघ्या काही तासांत सर्वांसमोर येणार आहे. आज कोणत्या राज्यांत, कोणाला बहुमत मिळेल, तर कुठे कोणतं सरकार स्थापन...More
Punajab Election Results 2022 Live Updates : देशातील पाच महत्त्वाच्या राज्यातील निवडणुकांचा निकाल अवघ्या काही तासांत सर्वांसमोर येणार आहे. आज कोणत्या राज्यांत, कोणाला बहुमत मिळेल, तर कुठे कोणतं सरकार स्थापन होणार आहे, हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान पंजाबचा विचार करता याठिकाणी यंदा सत्तापालट होण्याची दाट शक्यता आहे. एक्झिट पोलमध्ये आप पक्षाला बहुमत मिळाल्याने काँग्रेस तसंच अकाली दलातील अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पंजाबमध्ये 117 विधानसभा जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडले. मतदारांनी यावेळी समिश्र प्रतिसाद दर्शवल्याने 65.32 टक्के मतदान झाले होते. दरम्यान पंजाबमध्ये अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचार सभा घेतल्या होत्या. अरविंद केजरीवाल, राहुल गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गजांनी याठिकाणी प्रचार केला होता. दरम्यान काँग्रेस पक्षाचा विचार करता सध्याचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्यावर मोठी जबाबदारी असून या निवडणूकीसाठी तेच पक्षाचा चेहरा आहेत. त्यामुळे काँग्रेसकडून त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. चमकोर साहिब आणि भदौर अशा दोन ठिकाणी ते निवडणूक लढवत आहेत. याशिवाय काँग्रेसचा आणखी एक मोठा चेहरा म्हणजे नवज्योत सिंह सिद्धू हे अमृतसर पूर्वमधून उभे आहेत. तर यंदा एक्झिट पोलमध्ये विजयी आप पक्षाचा मोठा चेहरा म्हणजे भगवंत मान हे धुरी मतदार संघातून उभे आहेत. तर नेमकं पंजाबमध्ये कोणत्या मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, यावर एक नजर फिरवूया..पंजाबमध्ये कुणाची प्रतिष्ठा पणाला? चरणजीत सिंह चन्नी (काँग्रेस) - चमकोर साहिबचरणजीत सिंह चन्नी (काँग्रेस) - भदौरनवज्योत सिंह सिद्धू (काँग्रेस) - अमृतसर पूर्वविक्रम मजिठिया (अकाली दल ) - अमृतसर पूर्वभगवंत मान (आप) - धुरीकॅ.अमरिंदर सिंह (पीएलसी) - पतियाळा शहरप्रकाश सिंह बादल (अकाली दल) - लंबीसुखबीर सिंह बादल (अकली दल) - जलालाबादसुखजिंदर रंधावा (काँग्रेस) - डेरा बाबा नानकमालविका सूद (काँग्रेस) - मोगापंजाब निवडणुकांमधील गाजलेले मुद्देशेतकरी आंदोलनातील पंजाबपंजाब काँग्रेसमधला अंतर्गत वादकॅ.अमरिंदर सिंह यांचा राजीनामाअंमली पदार्थांचं सावटपंतप्रधान मोदी दौरा सुरक्षा प्रश्न2017 मध्ये कुणाला किती मिळाल्या होत्या जागा? 2017 च्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली होती. 117 जागापैकी काँग्रेसने 77 जागावर विजय मिळवला होता. तर अकाली दल 15, भाजप 3 आणि आम आदमी पार्टीला 20 जागांवर विजय मिळाला होता. तर दोन जागांवर अपक्षांनी बाजी मारली होती.
Punjab Elections 2022 LIVE : आतापर्यंतच्या कलांनुसार पंजाबमध्ये आपची 'मुसंडी'
Punjab Elections 2022 LIVE UPDATES : आतापर्यंतच्या कलांनुसार पंजाबमध्ये आपची 'मुसंडी'. आतापर्यंत 75 जागांवर आप आघाडीवर आहे. काँग्रेस 13 जागांवर तर अकाली दल 8 जागांवर आघाडीवर आहे. भाजपला 7 जागांवर आघाडी मिळाली आहे.