5 State Election Results 2022 LIVE: पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज हाती येत आहेत. यामध्ये पंजाब (Punjab Election Results), गोवा (Goa Election Results), उत्तरप्रदेश (Uttar Pradesh Election Results), उत्तराखंड (Uttarakhand Election Results) आणि मणिपूर (Manipur Election Results) या पाच राज्यांचा समावेश आहे. सुरुवातीचे कल आता हाती आले असून चित्र हळू हळू स्पष्ट होऊ लागलं आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये अनेक दिग्गज नेते पिछाडीवर असल्याचं दिसत आहे. यात तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे.
यामध्ये पंजाबमध्ये मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी (charanjit singh Channi), उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी (Pushkarsingh Dhami) हे मुख्यमंत्री सुरुवातीच्या कलांमध्ये पिछाडीवर आहेत. गोव्यामध्ये प्रमोद सावंत हे देखील दोन राऊंडपर्यंत पिछाडीवर होते. गोव्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देखील पिछाडीवर असल्याचं दिसतंय. मडगाव काँग्रेस उमेदवार दिगंबर कामत 2800 मतांनी आघाडीवर आहेत तर भाजपचे उमेदवार आणि उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर पिछाडीवर आहेत. गोव्यात सध्याच्या कलानुसार भाजप 18, काँग्रेस 13, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष 5, अपक्ष 2, गोवा फॉरवर्ड 1 आणि आप 1 जागेवर आघाडीवर आहे. उत्पल पर्रीकर हे देखील पिछाडीवर असल्याची माहिती आहे.
पंजाबमध्ये मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी यांच्यासह कॅप्टन अमरिंदर सिंह, सुखबीर सिंग बादल, प्रकाश सिंह बादल, नवजोत सिंह सिद्धू हे पंजाबच्या राजकारणातील सगळे दिग्गज सध्या पिछाडीवर आहेत.
उत्तरप्रदेशात सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप 240 च्या वर जागांवर आघाडीवर आहे तर समाजवादी पार्टी 111 पेक्षा अधिक जागांवर आघाडीवर आहे. पंजाबमध्ये आपनं चांगलीच मुसंडी मारल्याचं सुरुवातीच्या कलांमध्ये दिसतंय. आप 88 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस 35 जागांवर आघाडीवर आहे. गोव्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. सध्या काँग्रेस 15 तर भाजप 22 जागांवर आघाडीवर असल्याचं कळतंय.
उत्तराखंडमध्ये 43 पेक्षा जास्त जागांवर भाजप तर काँग्रेस 23 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. मणिपूरमध्ये काँग्रेस आतापर्यंतच्या कलांमध्ये आघाडीवर असल्याचं दिसतंय.
या ठिकाणी पाहा लाईव्ह निकालाचे अपडेट्स
https://marathi.abplive.com/live-tv/amp
https://twitter.com/abpmajhatv
https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA
संबंधित बातम्या