UP Election Results 2022: उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. समाजवादी (Samajwadi Party) पक्षाचे प्रमुख अखिलेश (Akhilesh Yadav) यादव यावेळीही सरकार स्थापन करण्यात अपयशी ठरताना दिसत आहेत.. यूपीमधील निवडणूक निकालांच्या ट्रेंडमध्ये भाजप बहुमताच्या खूप पुढे दिसत आहे. त्याचवेळी समाजवादी पक्षाचा आकडा 122 च्या आसपास फिरत आहे. अशा स्थितीत सत्तासंघर्षात अखिलेश यादव कुठे चुकले, असा प्रश्‍न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.


निवडणूक प्रचार रॅलीमध्ये अखिलेश यादव यांनी पूर्ण आत्मविश्वासाने दावा केला की, सपा पुन्हा एकदा उत्तर प्रदेशात सत्ता स्थापन करणार. सुरुवातीला त्यांनी 400 पारचा नाराही दिला होता. मात्र नंतर त्यांनी 300 पारचा नारा दिला. अखिलेश यादव यांच्या सभांमध्ये मोठी गर्दी होत होती. सपाचा जाहीरनामाही खूप चर्चेत होता. भाजप आणि मुख्यमंत्री योगी यांच्यावर निशाणा साधण्यातही त्यांनी कोणतीही कसर सोडली नाही. आता त्यांचे सर्व दावे फोल ठरताना दिसत आहेत. मात्र सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी करहल मतदारसंघातून मोठी आघाडी कायम ठेवली आहे.


निवडणूक निकालाच्या दोन दिवस आधी एक्झिट पोलचे निकाल समोर आले होते. ज्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा योगी सरकार येत असल्याचं दिसत होत. यानंतर अखिलेश यादव यांनी ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले होते. यावरून भाजपनेही अखिलेश यांच्यावर हल्लाबोल केला होता.


मतदारांनी घराणेशाहीचे राजकारण नाकारले : भाजप 


सध्याच्या ट्रेंडनुसार भाजप चार राज्यांत आघाडीवर आहे. हे पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराणेशाहीचे राजकारण नाकारण्याच्या आवाहनाला मतदारांनी प्रतिसाद दिल्याचा दावा भाजपने केला आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बी.एल. संतोष यांनी ट्विट केले की, "यूपीमध्ये भाजपचा विजय. पंजाबमधील आपचा विजय हा नवीन पर्याय आणि नवीन आशाचे आश्वासने देते. मात्र काही लोक सुधारणार नाहीत."


महत्त्वाच्या बातम्या: