Bank Jobsबँकेत नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. 


तेलंगणा स्टेट कोऑपरेटिव्ह एपेक्स बँक, TSCAB ने स्टाफ असिस्टंट आणि असिस्टंट मॅनेजर पदासाठी भरती सुरु आहे. इच्छुक उमेदवार 10 मार्च 2022 पर्यंत अधिकृत वेबसाइट tscab.in वर जाऊन या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. पात्र आणि इच्छुक उमेदवार TSCAB च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया 19 फेब्रुवारी 2022 पासून सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 445 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. ज्यामध्ये स्टाफ असिस्टंटच्या 372 आणि सहाय्यक व्यवस्थापकाच्या 73 पदांचा समावेश आहे.


पात्रता
पदवी परीक्षेत 60 टक्के गुण किंवा वाणिज्य शाखेत 55 टक्के गुणांसह पदवी पूर्ण केलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. यासोबतच तेलुगू आणि इंग्रजी भाषेचेही ज्ञान असणे अनिवार्य आहे.


वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे.


निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड प्राथमिक परीक्षा आणि मुख्य परीक्षेच्या आधारे केली जाईल. ऑनलाइन परीक्षा इंग्रजीमध्ये घेतली जाईल. सर्व पात्र झालेल्या उमेदवारांना ऑनलाइन चाचणीसाठी बोलावले जाईल. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha