Yogi Adityanath Ayodhya : उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Aadityanath) हे अयोध्येत (Ayodhya) विधानसभा निवडणूक लढणार आहेत. आयोध्येत  राम मंदिराची निर्मिती होत असून त्यामुळे समस्त हिंदू संघटनांमध्ये चांगलाच उत्साह निर्माण झाला आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांनी आयोध्या हा मतदारसंघ निवडल्याचे सुत्रांनी सांगितलं आहे. यावर केंद्रीय हायकमांड यांनी ग्रीन सिग्नलही दिला आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ निवडणूक लढवत असलेल्या जागेला महत्व प्राप्त झालेय. याचा फायदा भाजप पक्षाला होईल का? हे जाणून घेण्याचा प्रयत्न एबीपी-सी वोटर सर्व्हेच्या माध्यमातून घेण्यात आला.  योगी आदित्यनाथ यांनी आयोध्येतून निवडणूक लढवल्यास भाजपला फायदा होईल का? असा प्रश्न एबीपी-सी वोटर सर्व्हेमध्ये लोकांना  विचारण्यात आला आहे.  यावर लोकांनी विविध उत्तरे दिली आहेत. 


सर्व्हेत काय म्हटले लोकांनी?
एबीपी- सी वोटरच्या सर्व्हेनुसार, योगी आदित्यनाथ यांनी आयोध्येतून निवडणूक लढवल्यास याचा भाजपला फायदा होईल, असे अनेक लोकांनी सांगितले. सर्व्हेत सहभागी झालेल्या 56 टक्के लोकांनी भाजपला फायदा होईल, असे मत दिलेय. तर 31 टक्के लोकांना भाजपला फायदा होणार नाही, असे वाटतेय. तर 13 टक्के लोकांनी माहित नाही, असं उत्तर दिले आहे.  


अयोध्यावर भाजपची रणनीती - 
या आधी योगी आदित्यनाथ हे मथुरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी चर्चा होती. भाजपचे खासदार हरनाथ यादव यांनीही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहून तशी मागणी केली होती. भगवान श्रीकृष्ण आपल्या स्वप्नामध्ये आले होते आणि त्यांनी योगी आदित्यनाथ यांनी मथुरेतून निवडणूक लढवावी अशी इच्छा व्यक्त केल्याचं त्यांनी पत्रात नमूद केलं होतं. पण असं झाले नाही. सुत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, योगी आदित्यनाथ आयोध्यातून निवडणूक लढवणार आहेत.  या माध्यमातून संपूर्ण राज्यात भाजपकडून हिदुत्वाचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. आयोध्येत राम मंदिराची निर्मिती होत असून त्यामुळे समस्त हिंदू संघटनांमध्ये चांगलाच उत्साह निर्माण झाला आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: 



मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live