Rakesh Tikait : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तीने देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. दरम्यान, या निवडणुकीच्या मुद्यावरुन भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी योगी सरकारवर निशाणा साधला आहे. योगी आदित्यनाथ हे दिल्लीच्या दयेवर काम करत आहेत. मात्र, दिल्लीकरांचे धोरण वाईट आहे. दिल्लीचे धोरण उत्तर प्रदेशमध्ये लागू करु नका, ते धोरण जर लागू नाही केले तर राज्यात आणखी काम करता येईल असे टिकैत म्हणाले.


आजही अनेक ठिकणी हमीभावपेक्षा कमी दराने शेतमालाची विक्री होत आहे. शेतकऱ्यांना खते मिळत नाहीत. मोठ्या प्रमाणावर खतांची टंचाई असल्याचे टिकैत म्हणाले. हमीभावाच्या कायद्याबाबत सरकारबरोबर कोणती चर्चा झाली? असा प्रश्न टिकैत यांनी विचारला असता, ते म्हणाले की, केंद्र सरकार हमीभावच्या मुद्याबाबत एक समिती स्थापन करणार होते. मात्र, अद्याप समिती स्थापन करण्यात आली नाही. ती समितीच हमीभावाच्या कायद्याबाबत निर्णय घेईल असे टिकैत यांनी यावेळी सांगितले.


मुख्यमंत्र्यांना जर पूर्ण अधिकर दिले तर ते चांगेल काम करु शकतात. मायावती ज्यावेळेस मुख्यमंत्री होत्या, त्यावेळी त्यांनी उसाचा दर सर्वाधिक वाढवला, अखिलेश यांनीही वाढवला होता, योगींनी केवळ 35 रुपये वाढवले असल्याचे टिकैत म्हणाले. उत्तर प्रदेशमध्ये वीज सगळ्यात महाग आहे. योगी आदित्यनाथ यांच्याशी माझे चांगले संबध आहेत. तसेच अखिलेश यादव आणि मायवती यांच्याशी देखील चांगले संबंध असल्याचे यावेळी टिकैत यांनी सांगितले. मनमोहन सिंग सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या होत्य. मात्र, हे सरकार शेतकऱ्यांच्या कामात अडथळे आणत असल्याचे राकेश टिकैत म्हणाले. अर्थसंकल्प हा फक्त दिखावा असल्याचे टिकैत म्हणाले. बनावट शेतकरी बनवून बनावट खरेदी दाखविल्याचा आरोपही त्यांनी सरकारवर केला. आम्ही आंदोलनाबाबत बोलतो. आम्ही जर मतं मागायला लागलो तर त्यापेक्षा निवडणुका लढवलेल्या बऱ्या असेही ते म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या: