लखनौ: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज गोरखपूर शहर मतदारसंघातून आपला निवडणूक अर्ज भरला. यावेळी त्यांनी आपले शपथ पत्र दाखल केलं. त्यामधील माहितीनुसार, योगी आदित्यनाथ यांच्याकडे जवळपास 1.55 कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांच्या नावावर एकही जमीन, घर आणि गाडी नाही. पण त्यांच्याकडे एक रिव्हॉल्वर आणि रायफल आहे असं या शपथ पत्रात नमूद करण्यात आलं आहे. 


उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असलेल्या योगी आदित्यनाथ यांच्याकडे असलेल्या संपत्तीपैकी बहुतांश संपत्ती ही कॅश आणि बँक बॅलेन्सच्या रुपात आहे. त्यांच्याकडे एक सॅमसंग मोबाईल फोन आहे, या फोनची किंमत 12 हजार रुपये इतकी आहे. तसेच त्यांच्याकडे एक लाख रुपयाचे एक रिव्हॉल्व्हर आणि 80 हजार रुपयांची एक रायफल देखील आहे. 


योगी आदित्यनाथ यांच्याकडे कोणतेही वाहन नाही. त्यांच्या नवी दिल्लीतील एका अकाऊंटमध्ये 35.24 लाख रुपये आहेत तर 2.33 लाख रुपयांचा विमा आहे. योगी आदित्यनाथ यांच्याकडे कोणतीही स्थायी संपत्ती नाही. तसेच त्यांच्यावर कोणताही खटला नोंद नाही. 49 वर्षीय योगी आदित्यनाथ यांनी श्रीनगरमधील एचएन बहुगुणा विद्यापीठातून पदवी घेतली आहे. 


2014 पर्यंत योगींकडे तीन आलिशान गाड्या, 72 लाखांची संपत्ती
योगी आदित्यनाथ यांच्याकडे 2014 पर्यंत तीन आलिशान गाड्या होत्या. त्यामध्ये टाटा सफारी, इनोव्हा आणि फॉर्च्युनर यांचा समावेश होता. सध्या त्यांच्याकडे कोणतीही स्थायी संपत्ती नाही. सन 2014 मध्ये योगी आदित्यनाथ यांच्याकडे 72.17 लाख रुपयांची संपत्ती होती. 


महत्त्वाच्या बातम्या: