UP Assembly Election 2022 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांच्या 'यूपी टाईप' विधानावरून राजकीय संघर्ष पेटला आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी काँग्रेसने याला राजकीय मुद्दा बनवण्यास सुरुवात केली आहे. या विधानावरून काँग्रेसने आता अर्थमंत्र्यांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसच्या यूपी प्रभारी प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी ट्विटवरून अर्थमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे. हा उत्तर प्रदेशातील जनतेचा अपमान असल्याचे प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे.
प्रियांका गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, ''निर्मला जी, तुम्ही यूपीसाठी बजेट बॅगमध्ये काहीही ठेवले नाही, ते ठीक आहे, पण यूपीच्या लोकांचा असा अपमान करण्याची काय गरज होती? यूपीच्या लोकांना 'यूपी टाईप' असल्याचा अभिमान आहे. आम्हाला यूपीची भाषा, बोली, संस्कृती आणि इतिहासाचा अभिमान आहे.''
काय आहे प्रकरण?
अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत मोदी सरकारचा अर्थसंकल्प शून्य असल्याचे म्हणत, यात तरुण, मध्यमवर्ग, गरीबांसाठी काहीच नाही, असे वक्तव्य केले. राहुल यांच्या या वक्तव्यावर निर्मला सीतारमण यांना विचारले असता त्यांनी अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांना जाब विचारला. पंकज चौधरी म्हणाले की, ''राहुल गांधींना अर्थसंकल्प समजलेला नाही. अर्थसंकल्पात सर्वच क्षेत्रांसाठी घोषणा करण्यात आल्या आहेत.'' पंकज चौधरी यांचा मुद्दा पुढे करत निर्मला सीतारमण म्हणाल्या, ''चौधरी यांनी टिपिकल यूपी टाईप उत्तर दिले आहे. यूपीतून पळून गेलेल्या खासदारासाठी (राहुल गांधी) हे पुरेसे आहे असे मला वाटते. ज्या सर्व वर्गांसाठी राहुल बोलले आहेत त्यांच्यासाठी बजेटमध्ये काही ना काही तरी आहे.''
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- UP Election 2022: अखिलेश यादव यांच्या विरोधात काँग्रेस उमेदवार देणार नाही, जाणून घ्या काय आहे कारण
- ABP Opinion Poll: अर्थसंकल्पामुळे पाच राज्यात भाजपाला फायदा होईल का? जनतेनं दिलं चकित करणारं उत्तर
- UP Election 2022: काँग्रेस अखिलेश यादव यांच्याविरोधात निवडणूक लढवणार नाही, करहल मतदारसंघातून काँग्रेसची माघार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha