Ulhasnagar Assembly Constituency Election : उद्योगनगरी उल्हासनगरमध्ये महायुतीचा विजय झाला आहे. उल्हासनगर विधानसभा मतदारसंघाचा निकाल हाती आला असून भाजपचे कुमार आयलानी विजय मिळवला आहे. उद्योग नगरी उल्हासनगरमध्ये 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत रोमांचक लढत पाहायला मिळाली.  ठाणे जिल्ह्यातील औद्योगिक शहर मानल्या जाणाऱ्या उल्हासनगर मतदारसंघाच्या निवडणुकीकडे सर्वांच लक्ष होतं. उल्हासनगरच्या जनतेनं कुमार आयलानी यांनी बाजी मारली आणि उल्हासनगर विधानसभेवर भाजपचा झेंडा फडकवला. भाजपचे कुमार आयलानी यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे.


भाजपचे कुमार आयलानी सलग दुसऱ्यांदा विजय


उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक सिंधी भाषिक आहे, त्यामुळे हा मतदारवर्ग यंदा आमदार म्हणून जनता कुणाला निवडून देईल, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. विधनसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर आता जनतेचं माप भाजपकडे झुकलं आणि कुमार आयलानी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला.


उद्योगनगरी उल्हासनगरमध्ये मतदारराजाचा महायुतीला कौल


उल्हासनगरमध्ये तिन्ही सिंधी उमेदवारांमध्ये लढत पाहायला मिळाली. महायुतीने भाजपचे कुमार आयलानी आणि महाविकास आघाडीकडून शरद पवार पक्षाचे ओमी कलानी हे निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. त्यासोबतच राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे बंडखोर भरत गंगोत्री हे देखील उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. उद्योगनगरी उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातील जनतेने कुमार आयलानी यांना विजयी करत महायुतीच्या बाजूने कौल दिला.


उल्हासनगर विधानसभा मतदारसंघाचा 2024 चा निकाल



  • कुमार आयलानी - भाजप (विजयी)

  • ओमी कलानी - राष्ट्रवादी शरद पवार पक्ष


2019 चा निकाल



  • कुमार आयलानी (भाजप) - विजयी, 43666 मते

  • ज्योती कलानी (राष्ट्रवादी) - 41662 मते


2014 चा निकाल



  • ज्योती कलानी (राष्ट्रवादी) - विजयी, 43760 मते

  • कुमार आयलानी (भाजप) - 41897 मते


 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Ambernath Vidhan Sabha : अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ : शिवसेनेचे बालाजी किणीकर सलग चौथ्यांदा विजयी होणार की राजेंद्र वानखेडे बाजी पलटणार?