Ambernath Assembly Constituency Election : अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात यंदात तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. या मतदारसंघात यंदाची निवडणूक रंगतदार होणार आहे. शिवसेना शिंदे गटाने बालाजी किणीकर यांना उमेदवारी दिली आहे, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने राजेश वानखेडे यांना तिकीट दिलं आहे. अंबरनाथ मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत असताना वंचित बहुजन आघाडीनेही स्वत:चा उमेदवार दिला आहे. अंबरनाथमध्ये वंचित बहुजन आघाडीने सुधीर बागुल यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने निवडणुकीत तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
मतदारसंघ कसा आहे?
अंबरनाथ मतदारसंघ हा ठाणे जिल्ह्यात आहे. या मतदारसंघात अंबरनाथ तालुक्याच्या काही भागांचा समावेश होतो. 2011 मध्ये, अंबरनाथची लोकसंख्या अंदाजे 2,53,475 होती, त्यापैकी 1,32,582 पुरुष आणि 120,893 महिला होत्या. यामध्ये प्रामुख्याने हिंदू आहेत, येथील अंदाजे 80 टक्के लोकसंख्या हिंदू आहे. अंबरनाथ हा विधानसभा मतदारसंघ कल्याण लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.
मतदारसंघातील सध्याची स्थिती
2009 मध्ये झालेल्या मतदारसंघाच्या नवीन पुर्नरचनेनंतर हा मतदारसंघ तयार झाला. तेव्हापासून अंबरनाथ मतदारसंघ शिवसेनेचा गड मानला जातो. 2009 पासून येथे बालाजी किणीकर निवडून आले आहेत. 2009, 2014 आणि 2019 मध्ये शिवसेनेच्या तिकीटावर बालाजी किणीकर यांना जनतेने विजयी केलं आहे. आता सलग चौथ्यांदा बालाजी किणीकर विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत.
अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढती
- बालाजी किणीकर - शिवसेना (एकनाथ शिंदे )
- राजेश वानखेडे - शिवसेना (उद्धव ठाकरे)
- सुधीर बागुल - वंचित बहुजन आघाडी
2019 चा निकाल
- बालाजी किणीकर (शिवसेना) - विजयी, 59862 मते
- रोहित सॉल्वे (काँग्रेस) - 30738 मते
- धनंजय सुर्वे (वंबआ) - 16203 मते
2014 चा निकाल
- बालाजी किणीकर (शिवसेना) - विजयी, 47000 मते
- राजेश वानखेडे (भाजप) - 44959 मते
महत्त्वाच्या इतर बातम्या