Hidden Campaign thrugh Serials: राज्यातील विधानसभा निवडणुकांचा प्रचार सोमवारी थंडावल्यानंतरही टीव्हीवरील मालिकांमधून छुप्या पद्धतीनं प्रचार होत असल्याचे समोर येत आहे. स्टार प्रवाहवरील घरोघरी मातीच्या चुली आणि प्रेमाची गोष्ट या मालिकांचं चित्रिकरण करताना शिंदे गटाच्या प्रचाराची पोस्टर दाखवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. याची निवडणूक आयोगानं दखल घेतली आहे. मालिकांमधून छुपा प्रचार करताना पैंशाची देवाणघेवाण झाल्याचाही झाल्याचा संशय आहे.मालिकांमधून निवडणुकीचा छूपा प्रचार केल्यानं आता निवडणूक आयोगानं शिंदे गटाला येत्या २४ तासांत आपलं म्हणणं मांडण्याचे आदेश दिले आहेत. काँग्रेसनेते सचीन सावंत यांनी शिंदे गटानं मालिकांमधून छूपा प्रचार केल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. 


स्टारप्रवाहच्या दोन मालिकांमधून शिंदे गटाचा छूपा प्रचार?


स्टार प्रवाह चॅनलवर लागणाऱ्या दोन मालिकांमधून शिवसेना शिंदे गटाचा छूपा प्रचार होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रेमाची गोष्ट आणि घरोघरी मातीच्या चुली या मालिकांमध्ये चित्रकरण करताना शिंदे गटाची पोस्टर्स दाखवण्यात आली होती. पण या मालिकांच्या ओटीटीवरील प्रक्षेपणात ही पोस्टर नसल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळं शिंदे गटानं छुपा प्रचार केल्याचं सांगण्यात येत आहे. यात किती पैशांची देवाणघेवाण झाली असा सवालही उपस्थित होत आहे.


निवडणूक आयोगानं घेतली दखल


निवडणूक आयोगानं मालिकांमधून होणाऱ्या छुप्या प्रचाराची दखल घेतली असून शिवसेना शिंदे गटाला पुढील दोन दिवसात आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी सांगण्यात आले आहे. तशी लेखी नोटीसही शिंदे गटाला बजावण्यात आली आहे. राज्यातील विधानसभेच्या प्रचाराची धामधूम १८ तारखेला थंडावली असली तरी सोशल मीडियावरून तसेच मालिकांमधून छुपा प्रचार करण्याचा घाट शिंदे गटानं घातला असल्याची तक्रार काँग्रेसनेते सचीन सावंत यांनी शिंदे गटाकडून छुपा प्रचार होत असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली  होती. त्यानंतर आता निवडणूक आयोगानं शिंदे गटाला पुढील २४ तासांत यावर आपलं म्हणणं मांडण्यासाठी नोटीस दिली आहे.


हेही वाचा:


Sayli Sanjeev: आधी मनसे आता महायुती!, सायली संजीवनं महायुतीला व्होट करा म्हणताच चाहत्यांनी केली कानउघडणी