छत्रपती संभाजीनगर : जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि माझे संबंध स्नेहपुर्ण आहे. आजचा वेळ मी त्यांच्या भेटीसाठी दिलेला होता. राजकारण व्यतिरिक्तही काही विषय असतात. मित्र म्हणून मी भेटून मनोज जरांगे यांची विचारपूस करत असतो. अशी प्रतिक्रिया यांच्याछत्रपती संभाजीनगरचे शिंदे गटाचे उमेदवार आणि शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंतरवाली सराटीतील भेटीनंतर संजय शिरसाट यांनी हे भाष्य केलं आहे.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रविवारी कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे गटाचे उमेदवार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. यावेळी मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे यांना शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला होता. त्या पार्श्वभूमीवर आता शिंदे गटाचे आमदार आणि औरंगाबाद पश्चिम विधानसभेचे उमेदवार संजय शिरसाठ यांनी तडकाफडकी मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आंतरवाली सराटीत दाखल झाले. कालीचरण महाराज मनोज जरागेंना 'राक्षस' म्हटल्याने मराठा समाजामध्ये संतापाची लाट पसरली आहे. दरम्यान त्याचा फटका उद्या होणाऱ्या मतदानावर होऊ शकतो. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता मनोज जरांगे आणि संजय शिरसाट यांच्या भेटी ला वेगळं वळण प्राप्त झालं आहे. अशातच ही राजकीय भेट नसल्याचे संजय शिरसाट म्हणाले असले तरी कालीचरण महाराज यांनी केलेल्या वक्तव्याची किनार या भेटीला असल्याचे बोलले जात आहे.
अंबादास दानवे यांना पराभव दिसत असल्याने आरोप
छत्रपती संभाजीनगरमधील पैसे वाटतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सदर व्हिडीओ समोर आणला आहे. पश्चिम मतदार संघातील एका तांड्यावर मतदाराला प्रत्येक मतासाठी पाचशे रुपये वाटत असल्याचं आलं समोर आलं आहे. देवळाई तांडा येथे माजी नगरसेवकाकडून पैसे वाटप झाल्याचा दावा अंबादास दानवे यांनी केला आहे. तसेच पोलिसांच्या देखरेखीत पैसे वाटप झाल्याचा आरोपही अंबादास दानवेंनी केला आहे. या प्रकरणाबाबत बोलताना औरंगाबाद पश्चिम विधानसभेचे उमेदवार संजय शिरसाठ यांनी आपली प्रतिक्रिया देत अंबादास दानवे यांना त्यांचा पराभव दिसत आहे, त्यांना माहित आहे आपला पराभव होणार आहे, म्हणून ते असे आरोप करत असल्याचे शिरसाठ म्हणाले.
मी पैसे पाठवलेत की यांनी पैसे पाठवले, याची चौकशी पोलीस करतील. त्यासाठी ट्विट करायची गरज काय? पोलिसांना त्यांचं काम करू द्या. जे आरोपी असतील त्यांच्यावर कारवाई होईल. असेही ते म्हणाले.
ही बातमी वाचा: