एक्स्प्लोर

Uddhav Thackeray : माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा, मात्र त्यातील कपडे चोरू नको; एकनाथ शिंदेवर ठाकरेंची जहरी टीका

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : सलग दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे यांची बॅग तपासण्यात आली आहे. त्यावरून ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. 

धाराशिव : औसा इथं उद्धव ठाकरेंची आज पुन्हा एकदा बॅक तपासणी करण्यात आली. त्यावरून संतापलेल्या उद्धव ठाकरेंनी लोहारा येथील प्रचार सभेत एकनाथ शिंदेंवर जहरी टीका केली. मला शिंदे फडणवीस यांच्या सांगण्यावरून चेकिंगवर टाकलं आहे असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. मिंध्याच्या माझी बॅग तुझ्याकडेच देतो, ती घेऊन येत जा. फक्त त्यातील कपडे चोरू नकोस असा टोला त्यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला. बॅग तपासायला हरकत नाही, माझं मन आणि बॅग दोन्हीही स्वच्छ असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले. 

उद्धव ठाकरे यांच्या बॅगची सलग दुसऱ्या दिवशी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली. सोमवारी वणीमध्ये तर मंगळवारी औशामध्ये ठाकरेंच्या बॅगची झाडाझडती घेण्यात आली. त्यावर उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली. ते म्हणाले की, "मिंध्याच्या सांगण्यावरून माझी बॅग चेक केली जाते, तुझ्याकडेच संभाळायला देतो, घेऊन येत जा मात्र त्यातील कपडे चोरू नको; कारण चोर तो चोर असतो अशा शब्दात उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका केली. बॅग तपासायला हरकत नाही मन आणि बॅग दोन्हीही स्वच्छ आहे. मात्र माझी बॅग तपासता तशी मोदींची बॅग तपासणार का ? असा सवाल उध्दव ठाकरेंनी केला. लोहारा येथील शिवसेना उमेदवार प्रवीण स्वामी यांच्या प्रचार सभेत ठाकरे बोलत होते."

मोदी आणि अमित शाहांची बॅग तपासण्याचं आव्हान

उद्धव ठाकरेंची मंगळवारी लातूर जिल्ह्यातील औसामध्ये सभा होती. तिथं हेलिकॉप्टरनं पोहोचण्याआधीच निवडणूक आयोगाचं पथक सज्ज होते. हेलिकॉप्टर लँड झाल्यावर लगेचच बॅगांची तपासणी सुरू झाली. उद्धव ठाकरेंनी त्याचा व्हिडीओ बनवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची देखील बॅग तपासा, असं आव्हान उद्धव यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना दिलं. अपेक्षेप्रमाणं औसाच्या सभेत देखील ठाकरेंनी बॅग तपासल्याचा उल्लेख केला. 

गुजरातचे मंत्री प्रचारासाठी बॅगेतून फाफडा घेऊन येतात का असा प्रश्न शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विचारला. उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणीनंतर संजय राऊतांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.  सत्ताधाऱ्यांच्या बॅगा का तपासल्या जात नाहीत असा सवालही संजय राऊत यांनी केला.  

सत्तेचा दुरुपयोग सुरू असून विरोधकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप शरद पवार यांनी केला. विरोधकांच्या या गोष्टीचा निवडणुकीवर परिणाम होणार नाही असंही ते म्हणाले. 

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget