एक्स्प्लोर

शिवछत्रपतींच्या जमिनी विकण्यासाठी उदयनराजे भाजपमध्ये-राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांचा खळबळजनक दावा

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना साताऱ्याचा विकास करता आला नाही, असं म्हणणाऱ्या उदयनराजेंना विकास म्हणजे काय ते माहित नाही. ते दिवसा काय करतात ते साताऱ्याच्या जनतेला माहित आहे. शिवकालिन संस्थानिक जमिनी विकण्याची परवानगी देण्याचं आमिष दाखवल्यानं ते भाजपात आलेत, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी केला आहे.

मुंबई: देशभरातील राजे-रजवाड्यांना संस्थानिक जमिनी विकण्याची परवानगी देण्याचं आमिष दाखवून भाजप त्यांना आपल्याकडे वळवत आहे. उदयनराजेही शिवकालीन संस्थानिक जमिनी विकून कोट्यवधी रूपये मिळवू इच्छितात. त्यासाठीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी केलाय. मात्र, शिवरायांच्या जमिनी विकण्याचा प्रयत्न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभर आंदोलन करून असा प्रयत्न हाणून पाडेल, असंही मलिक म्हणाले. छ. उदयनराजे भोसले यांच्या पक्षांतराबाबत बोलताना मलिक म्हणाले की, १९९९च्या आधी उदयनराजे भाजपचे आमदार व मंत्री होते. राष्ट्रवादीनं त्यांना पराभूत केलं होत. पुढे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या आईंच्या मध्यस्थीमुळे शरद पवार त्यांना दरवेळी तिकिट देत असत. मात्र, पक्षात असूनही उदयनराजे नेहमी पक्षविरोधी भूमिका घेत. आता मात्र राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचा तर पराभव करीलच शिवाय साताऱ्यातल्या विधानसभेच्याही सर्व जागा जिंकेल, असा विश्वासही मलिकांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीत राहून साताऱ्याचा विकास करता आला नाही या उदयनराजेंच्या दाव्यावर सडकून टीका करत, 'उदयनराजेंना विकास कळत नाही. त्यांच्यात स्वत: विचार करण्याची ताकद आहे का?' असा सवाल मलिकांनी केला. उदयनराजे दिवसा काय करतात ते साताऱ्याच्या लोकांना माहित आहे. असा टोलाही त्यांनी लगावला. भाजपनं देशभरात राजेरजवाड्यांना भाजपात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. कमाल जमीन धारणा कायद्यामुळे संस्थानिक जमीनी विकता येत नाहीत. मात्र, त्यासाठीची परवानगी देण्याचं आश्वासन भाजपनं देऊ केल्याची आमची माहिती आहे. उदयनराजेंनाही अशाच शिवकालीन जमिनी विकून कोट्यवधी रूपये मिळवायचे आहेत. मात्र, असा काही प्रयत्न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यभर आंदोलन करण्याचा इशाराही मलिक यांनी दिला. छ. उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशानंतर राष्ट्रवादीतील काही नेत्यांकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनीही उदयनराजेंवर टीका करताना म्हटलं की, पवार साहेबांनी आपली राजकीय तत्वे बाजूला ठेवून ज्यांच्यावर मनापासून प्रेम केलं ते म्हणजे छ. उदयनराजे भासले. कोण गेलं, कोण आलं फरक पडत नाही पण वाईट एवढंच वाटतंय ज्याच्यावर पोटाच्या पोरासारखं प्रेम केलं त्यांनी असं करायला नाही पाहिजे होतं.
हे ही वाचा:
छत्रपती-पेशव्यांच्या तुलनेचं 'ते' वक्तव्य पवारांना भोवतंय?

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
Girls Students News : राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
Girls Students News : राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
ST Students School Admission: राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांनी सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही
राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांनी सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही
Embed widget