एक्स्प्लोर

राहुल गांधींच्या चेहऱ्यावरील 'हिरवा लेझर लाईट' काँग्रेसच्या कॅमेरामनच्या मोबाईलची, स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपची माहिती

काँग्रेस नेते अहमद पटेल, रणदीप सुरजेवाला यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला पत्र लिहून प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर एसपीजी चौकशी करुन गृह मंत्रालयाला अहवाल सादर केला.

नवी दिल्ली : राहुल गांधींच्या चेहऱ्यावरील हिरवी लाईट स्नाईपर हल्ल्यासंबधीची नसून काँग्रेसच्याच छायाचित्रकाराच्या मोबाईलचा प्रकाश असल्याचं गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. तसेच राहुल गांधी यांच्या सुरक्षेत कोणतीही चूक झाली नसल्याचं गृह मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

राहुल गांधी यांच्या सुरक्षेबाबत काँग्रेसने गृहमंत्री राजनाथ सिंह यांना चिट्ठी लिहिली होती. काल अमेठी येथील प्रचारादरम्यान राहुल गांधी यांच्या चेहऱ्यावर हिरवा लेझर लाईट आढळली होती. त्यानंतर गृह मंत्रालयाने एसपीजीच्या डायरेक्टर यांना घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते.

एसपीजीच्या डायरेक्टर यांनी गृह मंत्रालयाला दिलेल्या माहिती म्हटलं की, या घटनेची व्हिडीओ क्लिपचं निरीक्षण केल्यानंतर ती हिरवी लाईट काँग्रेसच्याच फोटोग्राफरच्या मोबाईलची आहे. तसेच कॅमेरामनच्या पोझिशनबाबत राहुल गांधी यांच्या खासगी स्टाफला कळवण्यात आलं होतं. त्यामुळे राहुल गांधी यांच्या सुरक्षेत कोणतीही कमी नसल्याचं एसपीजीच्या डायेरक्टर यांनी स्पष्ट केलं आहे.

याप्रकरणी काँग्रेस नेते अहमद पटेल, रणदीप सुरजेवाला यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला पत्र लिहून प्रकरणाच्या चौकशीची मागणी केल्याचं समोर आलं होत. मात्र अशा प्रकारे कोणतंही पत्र काँग्रेसने गृह मंत्रालयाला लिहिलं नसल्यांचं काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी स्पष्ट केलं आहे.

या पत्रावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते अमहत पटेल आणि रणदीप सुरजेवाला यांचं हस्ताक्षर आहे. त्यामुळे कुणी व्हायरल केलं असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 'भारताचे दोन माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्यासोबत घातपात झाला होता. 1991 साली लोकसभा निवडणुकांच्या काळातच राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती.' असा उल्लेखही या पत्रात करण्यात आला होता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Bangkok  : टायर फुटल्याने शाळेच्या बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू; सहलीला जाताना काळाचा घाला
टायर फुटल्याने शाळेच्या बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू; सहलीला जाताना काळाचा घाला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 7 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 : टॉप 25 न्यूज : 05 PM : राज्यातील महत्त्वाच्या बातम्या : 01 October 2024 : ABP MajhaVare Nivadnukiche Superfast News 05 PM: विधानसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे: 01 Oct 2024ABP Majha Headlines : 6 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Bangkok  : टायर फुटल्याने शाळेच्या बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू; सहलीला जाताना काळाचा घाला
टायर फुटल्याने शाळेच्या बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू; सहलीला जाताना काळाचा घाला
Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Embed widget