एक्स्प्लोर

आमदार भरणेंसाठी आता जागाच शिल्लक नाही; ते तरी काय करणार? : सुभाष देशमुख

इंदापूरची विधानसभेची जागा कॉंग्रेसला की राष्ट्रवादी काँग्रेसला यावर अद्याप निर्णय झालेला नाही. याबाबत सर्वत्र संभ्रम असतानाच, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी इंदापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे यांना जागेबाबत टोमणा मारला.

इंदापूर : इंदापूरचे आमदार भरणेंसाठी आता जागाच शिल्लक नाही, ते तरी काय करणार, मात्र भरणेंवर देवेंद्र फडणवीस आणि गिरीश बापट यांचं प्रेम असल्यामुळे अडचण यायची नाही, असं सूचक वक्तव्य सहकारमंत्री सुभाष देसाई यांनी केलं. इंदापूरमधील मानकरवाडी इथे एका खासगी कार्यक्रमात सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि आमदार दत्तात्रय भरणे यांच्यात जुगलबंदी रंगली. यावेळी बोलताना सुभाष देशमुख यांनी इंदापूर विधानसभेच्या जागा वाटपाबद्दलच्या दुखऱ्या विषयावर बोट ठेवत, आमदार भरणे यांना भाजपची दारे खुली असल्याचं सूचित केलं. इंदापूरची विधानसभेची जागा कॉंग्रेसला की राष्ट्रवादी काँग्रेसला यावर अद्याप निर्णय झालेला नाही. याबाबत सर्वत्र संभ्रम असतानाच, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी इंदापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे यांना जागेबाबत टोमणा मारला. ते म्हणाले की, "भरणे मामांसाठी सध्या जागाच शिल्लक नाही. त्यामुळे ते तरी का करणार. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह अन्य मंत्र्यांशी आमदार भरणे यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे त्यांना काहीच अडचण येणार नाही." दरम्यान, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याबाबत विचारणा केली असता, सुभाष देशमुख यांना आपली नाराजी लपवता आली नाही. "ते का भेटले, कधी भेटले हे त्यांनाच विचारा, मला माहिती व्हायला मी काही अंतर्यामी नाही," असं म्हणत त्यांनी आपली प्रतिक्रिया संपवली.

महत्त्वाच्या बातम्या

Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?
Sunetra Pawar on Someshwar Sugar Factory Election Result : निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
Someshwar Factory Election: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
Vidhan Parishad Election : पुण्यामध्ये भाजप महायुतीचा प्रचार नारळ फुटला! रविंद्र चव्हाणांच्या दौऱ्याने कार्यकर्त्यांत उत्साह; जुन्या पेन्शन संघटनेचा उघड पाठिंबा
पुण्यामध्ये भाजप महायुतीचा प्रचार नारळ फुटला! रविंद्र चव्हाणांच्या दौऱ्याने कार्यकर्त्यांत उत्साह; जुन्या पेन्शन संघटनेचा उघड पाठिंबा

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tejasvee Ghosalkar: एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
Rahul Gandhi on PM Modi: 'मोदीजी आपल्या सरकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात; ED, CBI ची आतली माहिती आम्हाला देत आहेत, त्यामुळे तुम्ही..' राहुल गांधींचा सनसनाटी गौप्यस्फोट
'मोदीजी आपल्या सरकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात; ED, CBI ची आतली माहिती आम्हाला देत आहेत, त्यामुळे तुम्ही..' राहुल गांधींचा सनसनाटी गौप्यस्फोट
भीमनवारांवची चौकशी तुकाराम मुंढे करू शकत नाहीत; गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया, पुण्यातील आंदोलनावर टीका
भीमनवारांवची चौकशी तुकाराम मुंढे करू शकत नाहीत; गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया, पुण्यातील आंदोलनावर टीका
Sanjay Raut on Delhi Protest: दिल्लीतील त्या कारमध्ये सापडले पोलिसांचे गणवेश, खाकी वर्दीतील गुंडांकडून आंदोलकांना मारहाण? संजय राऊतांनी शेअर केला धक्कादायक व्हिडीओ
दिल्लीतील त्या कारमध्ये सापडले पोलिसांचे गणवेश, खाकी वर्दीतील गुंडांकडून आंदोलकांना मारहाण? संजय राऊतांनी शेअर केला धक्कादायक व्हिडीओ
Gold Silver Rate : सोन्याच्या दरात मोठी वाढ; भाव दीड लाखांच्या पुढे, तर चांदीचे दर घसरले, वर्षाच्या अखेरीस दरात 'इतक्या' हजारांंची वाढ होण्याची शक्यता, तज्ज्ञांनी दिली माहिती
सोन्याच्या दरात मोठी वाढ; भाव दीड लाखांच्या पुढे, तर चांदीचे दर घसरले, वर्षाच्या अखेरीस दरात 'इतक्या' हजारांंची वाढ होण्याची शक्यता, तज्ज्ञांनी दिली माहिती
माझ्याजवळ मोदींची कुंडली, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत सोडणार नाही, देशाचा युवक आता थांबणार नाही; राहुल गांधींनी आरपारच्या लढाईसाठी रणशिंग फुंकलं!
माझ्याजवळ मोदींची कुंडली, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत सोडणार नाही, देशाचा युवक आता थांबणार नाही; राहुल गांधींनी आरपारच्या लढाईसाठी रणशिंग फुंकलं!
Pune MPSC Protest: MPSC आंदोलन स्थगित, पण ऋषिकेश गांगुर्डे नाराज; एक दिवस आधीच अहिल्यानगरला परतले, आता सांगितलं धक्कादायक कारण, म्हणाले, 2 दिवसांनी सगळं बोलणार!
MPSC आंदोलन स्थगित, पण ऋषिकेश गांगुर्डे नाराज; एक दिवस आधीच अहिल्यानगरला परतले, आता सांगितलं धक्कादायक कारण, म्हणाले, 2 दिवसांनी सगळं बोलणार!
या फोटोनं महाराष्ट्राच्या गृहखात्याचा निर्दयी चेहरा उघड केला, फडणवीस,मोदी वैगरे लोकांनी समाजाला कोणत्या नरकात ढकललं हेच दिसतं, 'तो' फोटो शेअर करत संजय राऊतांचा प्रहार
या फोटोनं महाराष्ट्राच्या गृहखात्याचा निर्दयी चेहरा उघड केला, फडणवीस,मोदी वैगरे लोकांनी समाजाला कोणत्या नरकात ढकललं हेच दिसतं, 'तो' फोटो शेअर करत संजय राऊतांचा प्रहार
Embed widget