एक्स्प्लोर

तेलंगणात 30 नोव्हेंबरला मतदान, 3 डिसेंबरला मतमोजणी; भाजपसाठी तेलंगणा महत्त्वाचं, काँग्रेस, BRS ही सज्ज; कोण मारणार बाजी?

Telangana Assembly Election Shedule 2023: तेलंगणामध्ये निवडणुका जाहीर होण्यापूर्वीपासूनच भाजप अॅक्शनमोडमध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच, बीआरएस, काँग्रेसनंही कंबर कसली आहे.

Telangana Assembly Election 2023:  केंद्रीय निवडणूक आयोगानं (Central Election Commission) सोमवारी (9 ऑक्टोबर) पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. तेलंगणात (Telangana Elections 2023) 30 नोव्हेंबरला मतदान पार पडणार असून 3 डिसेंबरला मतमोजणी केली जाणार आहे. याशिवाय मध्यप्रदेश (Madhya Pradesh Assembly Election 2023), राजस्थान, छत्तीसगड आणि मिझोराममध्येही निवडणुका होणार आहेत. सर्वच विधानसभा निवडणुका महत्त्वाच्या असल्या तरी यंदा तेलंगणाच्या निवडणुका अत्यंत रंजक असणार आहेत.

तेलंगणामध्ये निवडणुका जाहीर होण्यापूर्वीपासूनच भाजप अॅक्शनमोडमध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे. तेलंगणात भाजपच्या प्रचाराची धुरा स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी सांभाळताना दिसत असून सातत्यानं जाहीर सभा घेत विद्यमान सरकारवर टीकास्त्र डागत आहेत. त्यामुळे यंदा तेलंगणात निवडणूक चुरशीची होणार यात काही शंकाच नाही. तत्पूर्वी तेलंगणातील राजकीय समीकरण नेमकं कसं आहे ते जाणून घेऊयात... 

सध्या तेलंगणात राजकीय समीकरण काय? 

तेलंगणात यापूर्वी 2018 मध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या होत्या. या निवडणुकांमध्ये तेलंगणा राष्ट्र समितीला (सध्याची भारत राष्ट्र समिती) 88 जागांवर विजय मिळाला होता. के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्त्वात तेलंगणात बीआरएसनं सरकार स्थापन केलं. बीआरएसनंतर निवडणुकीत सर्वाधिक मतं काँग्रेसला मिळाली होती. काँग्रेसनं 19 जागा जिंकल्या होत्या. भाजपला केवळ एकाच जागेवर विजय मिळवता आला होता. तर असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएम 7 जागांवर, तर तेलगू देसमला 2 जागांवर विजय मिळाला होता. 

3 कोटींहून अधिक मतदार मतदान करणार 

नुकतीच तेलंगणातील आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने अंतिम मतदार यादी जाहीर केली होती. त्यानुसार तेलंगणात एकूण 3 कोटी 17 लाख 17 हजार 389 मतदार आहेत. यामध्ये महिला मतदारांची संख्या 1,58,43,339 आहे. तर पुरुष मतदारांची संख्या 1,58,71,493 आहे. एकूण मतदारांपैकी 2557 ट्रान्सजेंडर आहेत. याशिवाय यावेळी 15,338 सेवा मतदार आणि 2,780 विदेशी मतदार आहेत.

काँग्रेस आणि बीआरएसमध्ये चुरस 

राजकीय विश्लेषकांच्या मते तेलंगणामध्ये आगामी निवडणुकीत काँग्रेस आणि बीआरएस यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे. बीआरएस सध्या तेलंगणामध्ये सत्तेत आहे, तर काँग्रेसनं बीआरएसला पराभूत करण्यासाठी कंबर कसली आहे. काँग्रेसनं गेल्या काही दिवसांपासून तेलंगणामध्ये वर्किंग कमिटीच्या महत्त्वाच्या बैठकांचं आयोजन केलं होतं. याव्यतिरिक्त इथे बीआरएस आणि काँग्रेस यांच्यात पोस्टर वॉरही सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.  

कोणत्या राज्यात कधी मतदान? (Five State Voting & Counting Dates)

  • मिझोराम : 7 नोव्हेंबर रोजी मतदान (Mizoram Voting Date)
  • छत्तीसगड : 7  आणि 17 नोव्हेंबर रोजी मतदान (Chhattisgarh Voting Date)
  • मध्यप्रदेश : 17 नोव्हेंबर रोजी मतदान (Madhya Pradesh Voting Date)
  • राजस्थान : 23 नोव्हेंबर रोजी  मतदान (Rajasthan Voting Date)
  • तेलंगाणा : 30 नोव्हेंबर रोजी मतदान

पाच राज्यांचा निकाल - 3 डिसेंबर रोजी

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
NEET PG 2026: परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
NEET PG 2026: परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
Guhagar Kasturi Cat rare: गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Embed widget