एक्स्प्लोर
लालूंच्या मुलांमध्ये कटुता, तेजप्रताप यांच्याकडून 'लालू-राबडी मोर्चा'ची घोषणा
लालू प्रसाद यादव सध्या जेलमध्ये आहे आणि दोन्ही मुलांच्या नात्यामधील कटुता चव्हाट्यावर आली आहे. मात्र दोन्ही भावांमधील मतभेद आणि वादांवर बोलण्यास तेजस्वी बोलण्याचं टाळतात.

पाटणा : बिहारच्या राजकारणातील दिग्गज नेते लालू प्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल पक्ष दोन भागांमध्ये विभागला आहे. लालू प्रसाद यादव यांचे मोठे पुत्र तेजप्रताप यादव यांनी 'लालू-राबडी मोर्चा' या नव्या पक्षाची घोषणा केली आहे. सोबतच सारण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचंही जाहीर केलं. राजदने सारण लोकसभा मतदारसंघातून चंद्रिका राय यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. यामुळे तेजप्रताप यादव नाराज होते. चंद्रिका राय हे तेजप्रताप यादव यांचे सासरे आहेत. सारण हा लालू यादवांचा पारंपरिक लोकसभा मतदारसंघ आहे. "माझी आई म्हणजेच राबडी देवी यांनी तिथून निवडणूक लढवावी अशी माझा इच्छा आहे. जर त्यांनी निवडणूक लढवली नाही तर त्या जागेवर मी निवडणूक लढवेन आणि जिंकेनही, कारण इथल्या जनतेचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे," असं तेजप्रताप यादव यांनी म्हटलं आहे. तेजप्रताप यांनी शिवहर आणि जहानाबाद या दोन मतदारसंघातून उमेदवार घोषित केले आहेत. जहानाबादमधून चंद्रप्रकाश 'लालू-राबडी मोर्चा'चे उमेदवार असतील. इथे सुरेंद्र यादव हे राजदचे अधिकृत उमेदवार आहेत. तेजस्वी आणि तेजप्रताप यांची राजकीय कारकीर्द तेजप्रताप आणि तेजस्वीच्या वयामध्ये केवळ एका वर्षाचं अंतर आहे. तेजप्रताप 30 वर्षांचे असून तेजस्वी यांचं वय 29 वर्ष आहे. लालू यादव यांनी दोन्ही मुलांना 2013 मध्ये पाटण्याच्या परिवर्तन रॅलीमध्ये लॉन्च केलं होतं. याचा अर्थ ना दोघांच्या वयात जास्त अंतर आहे, ना राजकीय कारकीर्दीत. तेजप्रताप यांच्या तुलनेत तेजस्वी यांच्यावर लालूंचा जास्त जीव असल्याचं त्यांचे निकटवर्तीय सांगतात. 2015 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत तेजस्वी आणि तेजप्रताप निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते आणि दोघेही जिंकले होते. त्यावेळी तेजस्वी बिहारचे उपमुख्यमंत्री बनले तर तेजप्रताप आरोग्य मंत्री. लालू यांच्या या निर्णयाने तेजप्रताप नाराज होते, त्यानंतरच त्यांच्या मनात उपेक्षेची भावना निर्माण झाल्याचं म्हटलं जातं. लालू प्रसाद यादव सध्या जेलमध्ये आहे आणि दोन्ही मुलांच्या नात्यामधील कटुता चव्हाट्यावर आली आहे. मात्र दोन्ही भावांमधील मतभेद आणि वादांवर बोलण्यास तेजस्वी बोलण्याचं टाळतात. महागठबंधनच्या उमेदवारांच्या घोषणेने तेजप्रताप नाराज तेजस्वी यादव यांनी पत्रकार परिषद घेऊन महागठबंधनच्या उमेदवारांची घोषणा केल्याने परिस्थिती आणखीच बिघडली. माजी मंत्री चंद्रिका राज हे सारण मतदारसंघातून भाजपच्या राजीव प्रताप रुडी यांना आव्हान देतील, अशी घोषणा राजदने केली. चंद्रिका राय यांना तिकीट मिळणं हा तेजप्रताप यांच्यासाठी आणखी एक झटका होता. चंद्रिका राय हे तेजप्रताप यांचे सासरे आहेत. विशेष म्हणजे तेजप्रताप यांनी पत्नी एश्वर्या रायपासून घटस्फोट घेण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. तेजप्रताप यांचा राजीनामा आपल्या पसंतीच्या लोकांना लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाकडून उमेदवारी न मिळाल्याने तेजप्रताप यांनी विद्यार्थी राजदच्या संरक्षक पदाचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर तेजप्रताप यांनी ट्विटरवर म्हटलं आहे की, " विद्यार्थी राजदच्या संरक्षकपदाचा राजीनामा देत आहे. मला अपरिपक्व समजणारे स्वत: अपरिपक्व आहेत. कोण किती पाण्यात आहे हे मला माहित आहे."
आणखी वाचा




















