Thalapathy Vijay | थलापती विजय सायकलवरून मतदानाला, ट्विटरवर पेट्रोल-डिझेल दरवाढ ट्रेन्डिंग
दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजय (Thalapathy Vijay) आपल्या मतदानाचा हक्क बजावायला थेट सायकलवरून आला आणि ट्विटरवर पेट्रोल-डिझेल दरवाढीची (Petrol Diesel price hike) चर्चा रंगल्याचं दिसून आलं.
चेन्नई : तामिळनाडूमध्ये आज विधानसभेसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीत आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी थलापती विजय हा थेट सायकलवरून आला. विजयने आपल्या मतदानाचा हक्क चेन्नईतील निलनकेरी या ठिकाणी बजावला. पण त्याच्या या कृत्यामुळे ट्विटरवर वेगळीच चर्चा रंगली आहे. विजयच्या सायकलवरून येण्याने पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेल दरवाढीची चर्चा रंगली आहे.
थलापती विजयच्या या सायकलवारीचा व्हिडीओ अवघ्या काही क्षणातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. विजयने गाडीतून न येता सायकरवारी का केली याच्याबद्दल अनेकांनी वेगवेगळे तर्क मांडायला सुरू केले. पण विजयच्या सायकलवारीमागे देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये झालेली भरमसाठ वाढ हेच कारण असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं. ट्विटरवर तर अनेक दिवसांच्या नंतर पेट्रोल-डिझेल दरवाढ ट्रेन्ड होत आहे.
Need instant Goosebumps just check this Video !😉 @actorvijay pic.twitter.com/nv2Bsi3YXx
— #Thalapathy65 (@Vijay65FilmPage) April 6, 2021
देशात गेल्या महिन्यापर्यंत सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत होती. जेव्हापासून आसाम, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, पद्दुचेरीच्या निवडणुका जाहीर झाल्या तेव्हापासून या किंमती वाढायच्या कुठेतरी थांबल्याचं दिसून आलंय. मुंबई, दिल्लीसह अनेक शहरात या किंमती शंभरी गाठायच्या सीमेवर आहेत.
तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी येथील सर्व जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तामिळनाडूमधील 234, केरळमधील 140 आणि पुद्दुचेरीच्या 30 जागांसाठी आज मतदान होणार आहे. तामिळनाडूमधील 234 जागांसाठी एकूण 4218 उमेदवार, केरळमधील 140 जागांसाठी 957 उमेदवार निवडणूक रिंगणात असतील.
तामिळनाडूतील जनता आज 4218 उमेदवारांचे भवितव्य ठरवेल. सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत मतदान सुरु होईल. शेवटचे 1 तास संध्याकाळी 6 ते सायंकाळी 7 या वेळेत कोरोना रुग्णांसाठी राखीव राखीव ठेवण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या :