एक्स्प्लोर

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारचा निर्णयांचा धडाका, मंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल 25 मोठे निर्णय

महाराष्ट्रात गणेशोत्सवानंतर कधीही आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे मात्र त्याअगोदरच मंत्रिमंडळ बैठकीत हे जंबो निर्णय घेण्यात आले आहेत.

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आज राज्य सरकारकडून लोकप्रिय निर्णयांचा धडाका लावला. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल पंचवीस निर्णय घेण्यात आले. विनाअनुदानित शाळा, महाविद्यालयांना 20 टक्के अनुदान, नाशिक मेट्रो प्रकल्पाला ग्रीन सिग्नल, मुंबईतल्या जीर्ण इमारतींचा पुनर्विकास, यासोबतच आणखी बऱ्याच महत्त्वाच्या आणि लोकप्रिय विषयांबंबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आले.

विधानसभा निवडणुकांसाठीची आचारसंहिता लागण्याआधीच सरकारकडून या महत्त्वाच्या निर्णयांवर भर देण्यात आला आहे. महाराष्ट्रात गणेशोत्सवानंतर कधीही आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे मात्र त्याअगोदरच मंत्रिमंडळ बैठकीत हे जंबो निर्णय घेण्यात आले आहेत.

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त) : 28 ऑगस्ट 2019

  1. राज्यातील मान्यवर ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांच्या मानधनात दीडपटीने वाढ
  1. मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेच्या टप्पा 2 व 3 ला मान्यता
  2. सदनिकांच्या मालकी अधिकाराची नोंद अभिलेखात घेण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल नियम 2019 नव्याने तयार करण्यात येणार
  1. शासकीय आश्रमशाळांचे इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमामध्ये रुपांतर करण्याचा निर्णय
  1. नाशिक महानगर प्रदेश क्षेत्रात सार्वजनिक जलद परिवहन व्यवस्था प्रकल्पाअंतर्गत मेट्रो प्रकल्प राबवण्यास मान्यता
  1. मुंबई शहरातील जीर्ण व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त व बिगर उपकरप्राप्त इमारतींचा समूह पद्धतीने पुनर्विकास करण्यासाठी म्हाडा अधिनियमात सुधारणा
  1. विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्यास मान्यता
  1. शासकीय वैद्यकीय, दंत व आयुर्वेद आणि शासन अनुदानित आयुर्वेद व युनानी महाविद्यालयातील आंतरवासितांचे विद्यावेतन सहा हजारांवरून अकरा हजार रुपये
  1. कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी अध्ययन व संशोधन केंद्र सुरू करण्यास मान्यता
  1. राज्यातील शहरांमधील विघटनशील (ओल्या) कचऱ्यापासून तयार करण्यात येणाऱ्या कंपोस्ट खत निर्मितीला चालना देण्यासाठी प्रोत्साहन अनुदान
  1. बुलडाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पाला तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता
  1. पर्यटन प्रकल्पांना देय असलेली वित्तीय प्रोत्साहने वितरित करण्याबाबत
  1. महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी नाशिक अंतर्गत एकलव्य निवासी शाळांमध्ये पहिले ते पाचवीचे वर्ग सुरू करण्यात येणार
  1. नागपूरच्या मिहान प्रकल्पास सुधारित प्रशासकीय व वित्तीय मान्यता
  1. वर्धा येथे नवीन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय सुरू करण्यास मान्यता
  1. कायमस्वरुपी बंद करण्यात आलेल्या आदिवासी विभागाच्या अनुदानित आश्रमशाळा ठाणे जिल्ह्याच्या कल्याण येथील अखिल भारतीय मागासवर्गीय समाज प्रबोधन संस्थेस हस्तांतरित व स्थलांतरित करून आदिम जमातीतील विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा चालविण्यास मान्यता
  1. राष्ट्रीय सहकार विकास निगम यांच्याकडून महाराष्ट्र शासनामार्फत खेळत्या भागभांडवलासाठी मार्जिन मनी लोन सहकारी साखर कारखान्यांना उपलब्ध करण्यात येणार
  1. नाशिकच्या शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाला राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त विकास महामंडळाकडून कर्ज स्वरुपात निधी मिळण्यासाठी शासन हमी
  1. नागपूरच्या मौजा बिनाकी येथील बिनाकी हाऊसिंग स्कीममधील झोपडपट्टी वसाहतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या लाभात होणाऱ्या दस्तावरील मुद्रांक शुल्कात सवलत देण्यास मंजुरी
  1. मुंबई येथे हैदराबाद (सिंध) नॅशनल कॉलिजिएट युनिव्हर्सिटी स्थापन करण्यास मान्यता
  1. महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम-1949 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता. अवैध साठा, विक्री केल्यास शिक्षेत वाढ
  1. मिशन मंगल या हिंदी चित्रपटास राज्य जीएसटी कराच्या परताव्यासाठी शासन निर्णय काढण्यास मान्यता
  1. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील कलम 48(8) मध्ये सुधारणा
  1. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 24-अ मध्ये सुधारणा करण्याबाबत. अध्यादेश पुन्हा जारी करण्यास मान्यता
  1. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम व महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमामध्ये सुधारणा करणार, सरपंच, पंचायत समिती सभापती आणि जिल्हा परिषद अध्यक्षांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास पुरेसा कालावधी मिळणार
 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Embed widget