UP Election 2022 : उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातील वातावरण चांगलच तापलं आहे. सर्वच पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. आता तर उत्तर प्रदेशमध्ये भाजपने दहशतवाद याच मुद्याला आपले हत्यार बनवले आहे. अखिलेश यादव यांना रोखायचे असेल तर आता दहशतवाद याच मुद्याने रोखता येईल, असे भाजपला वाटत आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजवादी पक्षाच्या सायकल या चिन्हाला दहशतवादासोबत जोडले आहे. परंतु, अखिलेश यादव यांनी यावर आता नो कमेंट ही स्ट्रॅटेजी सुरू केली आहे. 
 
 सायकलवरून बॉम्ब फोडले जातात, असे वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यावर उत्तर देताना अखिलेश म्हणाले की, सायकल ही गरिबांची शान आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही हाच मुद्दा पुढे केला आहे. भाजप नेत्यांनी अखिलेश यादव यांचे कनेक्शन अहमदाबाद बॉम्बस्फोटातील आरोपींशी जोडले आहे. या प्रकरणात फाशीची शिक्षा झालेल्या आझमगढ येथील सैफचे वडील शादाब यांनी आगीत इंधन भरण्याचे काम केले आहे. अखिलेश आणि त्यांचा पक्ष दहशतवाद्यांना पाठिंबा देत असल्याचे बोलले जात आहे, अशी टीका भाजपकडून करण्यात येत आहे. 


उत्तर प्रदेशमध्ये भाजपकडून धार्मिक मुद्यांवर प्रचार केला जात आहे. तर सांप्रदायिक ध्रुवीकरण रोखण्यासाठी अखिलेश यादव प्रयत्न करत आहेत. दहशतवादाच्या ताज्या टीकेवरून समाजवादी पक्ष सायलेंट मोडमध्ये गेला आहे. पक्षाच्या प्रवक्त्यांना या मुद्द्यावर मौन बाळगण्यास सांगण्यात आले आहे. यूपी निवडणुकीत हिजाब घालून प्रवेश केल्यापासून प्रवक्त्यांना मुलाखती देण्यास किंवा कोणत्याही वादविवादाला जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.  एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी हिजाबच्या समर्थनार्थ उघडपणे उभे आहेत. त्यांनी मंचावरून अखिलेश यादव यांना मुस्लिम म्हणण्याचे आव्हानही दिले आहे.


दोन्ही पक्षांच्या या सापळ्यात अडकलो तर मागच्या वेळी जी परिस्थिती झाली तीच यावेळीही होऊ शकते, याचा अंदाज अखिलेश यादव यांना आला आहे. त्यामुळेच समाजवादी पक्षाने गरीबी, बेरोजगारी शेतकरी आणि तरूणांच्या प्रश्नांसारखे मुद्दे पुढे केले आहेत. आतापर्यंत झालेल्या तीन टप्प्यातील मतदानात समाजवादी पक्षाला या मुद्यांमुळे चांगला फायदा झाला आहे. त्यामुळे भाजपच्या सापळ्यात न अकडण्याची अखिलेश यादव यांनी शपथच घेतली आहे.  


महत्वाच्या बातम्या