Priyanka Chopra : बॉलिवूड आणि हॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राची आई मधू चोप्रा यांनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पती डॉ. अशोक चोप्रांसोबतचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. प्रियांकाचे वडील हयात नाहीत. त्यामुळे त्यांचे हे फोटो पाहून जुन्या आठवणी ताज्या झाल्या, अशा कमेंट नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. तर प्रियांका चोप्राचे सासरे म्हणजेच निक जोनासच्या वडिलांनीही मधू यांच्या पोस्टवर कमेंट केली आहे. त्यांनी मधू यांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या मनात एक गोष्टही सांगितली.
केविन जोनास यांनी आपल्या कमेंटमध्ये लिलिले आहे की, 'लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. आम्ही त्यांना ओळखू शकलो असतो. आमच्या आयुष्यात आल्याबद्दल तुमचे आणि प्रियांकाचे धन्यवाद. केविन जोनास यांच्या कमेंटनंतर प्रियांकानेही कमेंट केली आहे. तीने आपल्या कमेंटमध्ये लिहिले आहे की, 'अमेझिंग पिक्चर.' प्रियांकाच्या चुलत बहिणीनेही या फोटोला 'सुंदर काकू.' अशी कमेंट केली आहे.
प्रियांकानेही आपल्या इंन्स्टाग्रामवरून आई-वडिलांचा फोटो शेअर करत दोघांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. प्रियांकाने शेअर केलेल्या फोटोमध्ये डॉ. अशोक चोप्रा पत्नी मधू यांना गुलाबाचे फूल देत असल्याचे दिसत आहे. "मी तुमच्या लग्नाचा वाढदिवस असाच आठवणीत ठेवते. तुमची आठवण येते. तुमच्यावर प्रेम आहे, असे कॅप्शन प्रियांकाने या पोस्टला दिले आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी पॉल केविन जोनास सीनियरच्या वाढदिवसानिमित्त डॉ. मधू चोप्रा यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. 'वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, माझ्या प्रिय केविन सीनियर, आनंदी राहा, खूप प्रेम.' अशा शुभेच्छा मधू यांनी दिल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या
- Priyanka Chopra : देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा झाली आई, सोशल मीडिया अकाउंटवरून दिली माहिती
- Priyanka Chopra : 'The Matrix Resurrections' सिनेमात प्रियांका चोप्रा साकारणार 'सती'ची भूमिका
- Priyanka Chopra ने इन्स्टाग्राम, ट्विटरवरुन हटवले Nick Jonas चे आडनाव... सोशल मीडियावर रंगल्या घटस्फोटाच्या चर्चा