IND Vs SL T20 Series:  भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेला येत्या 24 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. भारताविरुद्ध टी-20 मालिकेसाठी श्रीलंकेनं संघ जाहीर केलाय. भारत दौऱ्यावर दसुन शनका टी-20 मालिकेचं नेतृत्व करणार आहे. श्रीलंकेच्या जाहीर केलेल्या संघात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आलीय. यात दिनेश चंडीमल, चरिथ असलंका आणि कुशल मेन्डिसचाही समावेश आहे. 


भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला टी-20 सामना भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तर, दुसरा आणि तिसरा टी-20 सामना धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर खेळण्यात येणार आहे. 


भारत विरुद्ध श्रीलंका टी-20 मालिकेचं वेळापत्रक:
पहिला टी-20 सामना- 24 फेब्रुवारी
दुसरा टी-20 सामना- 26 फेब्रुवारी
तिसरा टी-20 सामना- 27 फेब्रुवारी


श्रीलंकेचा टी-20 संघ:
दसुन शनका (कर्णधार), पथुम निसानका, कुसल मेन्डिस, चरित असलांका (उपकर्णधार), दिनेश चांदीमल, दनुष्का गुणथिलक, कामिल मिश्रा, जनिथ लियानागे, वानिंदु हसरंगा, चमिका करुणारत्ने, दुष्मंथा चमीरा, लाहिरू कुमारा, बिनुरा फर्नांडो, शिरन फर्नांडो, महेश दीक्षाना, जेफरी वेंडरसे, प्रवीण जयविक्रमा, आशियान डेनियल.


भारताचा टी-20 संघ:
 रोहित शर्मा (कर्णधार), रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्य कुमार यादव, संजू सॅमसन, इशान किशन (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, दीपक हुडा, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, रवी बिष्णोद, रवींद्र चहल यादव, मो. सिराज, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha