एक्स्प्लोर

सोलापूर लोकसभा । सुशीलकुमार शिंदेंच्या राजकीय जीवनाचा शेवट अखेर पराभवानेच, भाजपच्या स्वामींचा करिष्मा

यंदाची निवडणूक ही आपली शेवटची निवडणूक असेल असे म्हणत भावनिक आवाहन केलं मात्र भावनिक आवाहनाला साथ न देता सोलापूरच्या जनतेने डॉ. जयसिद्धेश्वर यांनाच साथ दिल्याचं दिसून आलं आहे.

सोलापूर :  2014 च्या मोदी लाटेत नवख्या शरद बनसोडेकडून पराभव झाल्यानंतर यंदाच्या निवडणुकीत देखील सुशीलकुमार शिंदे यांचा दारुण पराभव झाला आहे. सोलापूर मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा सामना भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्याशी होता. ही माझी शेवटची निवडणूक आहे, असे निवडणुकीपूर्वी घोषित करणाऱ्या सुशीलकुमार शिंदेंचा सपशेल पराभव झाला आहे. निवडणुकीच्या सुरुवातीला सुशीलकुमार शिंदे हेच सोलापूरमधून विजयाचे दावेदार असतील अशी चर्चा होती मात्र भाजपतर्फे धार्मिक कार्ड खेळत विद्यमान खासदार शरद बनसोडे यांचा पत्ता कट करून लिंगायत धर्मगुरू असलेल्या डॉ. जय सिद्धेश्वर शिवाचार्यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. त्यातच प्रकाश आंबेडकरांनी सोलापुरातूनही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने निवडणुकांच्या घोषणेपासूनच शिंदेच्या डोकेदुखीत वाढ झाली होती.  यंदाची निवडणूक ही आपली शेवटची निवडणूक असेल असे म्हणत भावनिक आवाहन केलं मात्र भावनिक आवाहनाला साथ न देता सोलापूरच्या जनतेने डॉ. जयसिद्धेश्वर यांनाच साथ दिल्याचं दिसून आलं आहे. सुशीलकुमार शिंदेंना वंचितचा फटका? यंदाच्या निवडणुकीत सोलापुरात वंचित फॅक्टरची भर पडली. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी स्वतःच सोलापूर मतदार संघातून उमेदवारी भरली. प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीमुळे सुशीलकुमार शिंदेंच्या अडचणीत आणखी वाढ होणार अशी शक्यता होती. ही शक्यता बऱ्यापैकी खरी ठरली आहे. सोलापूर मतदारसंघाची आकडेवारी - भाजप : जय सिध्देश्वर महास्वामी - 526985 - कॉंग्रेस : सुशीलकुमार शिंदे - 366377 - वंचित : प्रकाश आंबेडकर -170007

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
Embed widget