एक्स्प्लोर

पंकजा मुंडेंचा विनायक मेटेंना धक्का, मेंटेचे दोन जिल्हा परिषद सदस्य भाजपमध्ये

विशेष म्हणजे मुख्यमंत्री तिकडे घटक पक्षांच्या नाराज नेत्यांची मनधरणी करत होते असताना इकडे मात्र पंकजा मुंडे यांनी त्यांचे दोन जिल्हा परिषद सदस्य फोडून मेटेंना आव्‍हान दिलं आहे.

बीड : घटक पक्ष म्हणून राज्याच्या सत्तेत असलेल्या शिवसंग्राम पक्षाने बीड जिल्ह्यात मात्र कायम भाजपपासून दोन हात अंतर ठेवले आहे. अगदी बीड लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे काम करणार नाही, असा पवित्रा विनायक मेटे यांनी घेतला त्यानंतर स्वतः मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यात एक आणि बाहेर एक असं करता येणार नाही, असा अल्टीमेटम दिला होता. मात्र आता मेंटेना पंकजा मुंडेंनी त्यांना जोरदार धक्का दिला आहे. बीड जिल्हा परिषदेमध्ये विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाचे एकूण चार सदस्य निवडून आले होते. त्यातील एक यापूर्वीच भाजपाच्या मांडवाखाली आला आहे. आता आणखी दोन म्हणजे विजयकांत मुंडे आणि अशोक लोढा या दोन जिल्हा परिषद सदस्यांनी पंकजा मुंडेंच्या नेतृत्वात भाजपामध्ये प्रवेश केला शिवसंग्राम पक्षाचा प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के यांना विनायक मेटेंपासून दूर करण्यात यापूर्वीच पंकजा मुंडेंना यश आलं होतं. आता उर्वरित दोन जिल्हा परिषद सदस्य भाजपात घेऊन पंकजा मुंडेंनी विनायक मेटे यांना चेकमेट केलं आहे. दुसरीकडे भाजपसोबत असलेले घटक पक्ष नाराज आहेत, अशा चर्चा होत असतानाच काल मुख्यमंत्र्यांनी घटक पक्षातील सर्व सदस्यांसोबत एक बैठक घेऊन नाराजी दूर केल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री तिकडे घटक पक्षांच्या नाराज नेत्यांची मनधरणी करत होते असताना इकडे मात्र पंकजा मुंडे यांनी त्यांचे दोन जिल्हा परिषद सदस्य फोडून मेटेंना आव्‍हान दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

अमेरिकेचा 250 वा स्वातंत्र्यदिन: न्यूयॉर्कमध्ये संचलन, वॉशिंग्टनवरून फायटर जेट, मियामीमध्ये ड्रोन शो अन् नयनरम्य फटाक्यांची आतषबाजी
अमेरिकेचा 250 वा स्वातंत्र्यदिन: न्यूयॉर्कमध्ये संचलन, वॉशिंग्टनवरून फायटर जेट, मियामीमध्ये ड्रोन शो अन् नयनरम्य फटाक्यांची आतषबाजी
Ketan Agrawal Case: नातवाच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या केतन अग्रवालच्या आजोबांनी जीव सोडला, देवीचंद अग्रवालांचा मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
नातवाच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या केतन अग्रवालच्या आजोबांनी जीव सोडला, देवीचंद अग्रवालांचा मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
Ind vs Eng 2nd T20 : नाव घेणार नाही पण..., श्रेयस अय्यरने 'या' खेळाडूवर फोडले पराभवाचे खापर; सामन्यानंतर सगळं सांगून टाकलं
नाव घेणार नाही पण..., श्रेयस अय्यरने 'या' खेळाडूवर फोडले पराभवाचे खापर; सामन्यानंतर सगळं सांगून टाकलं
Balbharati Marathi Book: बालभारतीच्या इयत्ता सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील 'लोकनृत्य' धडा वादाच्या भोवऱ्यात? जेष्ठ साहित्यिक श्रीपाद जोशींचं मुख्यमंत्र्यांना पत्र; नेमकं प्रकरण काय?
बालभारतीच्या इयत्ता सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील 'लोकनृत्य' धडा वादाच्या भोवऱ्यात? जेष्ठ साहित्यिक श्रीपाद जोशींचं मुख्यमंत्र्यांना पत्र; नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमेरिकेचा 250 वा स्वातंत्र्यदिन: न्यूयॉर्कमध्ये संचलन, वॉशिंग्टनवरून फायटर जेट, मियामीमध्ये ड्रोन शो अन् नयनरम्य फटाक्यांची आतषबाजी
अमेरिकेचा 250 वा स्वातंत्र्यदिन: न्यूयॉर्कमध्ये संचलन, वॉशिंग्टनवरून फायटर जेट, मियामीमध्ये ड्रोन शो अन् नयनरम्य फटाक्यांची आतषबाजी
Ketan Agrawal Case: नातवाच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या केतन अग्रवालच्या आजोबांनी जीव सोडला, देवीचंद अग्रवालांचा मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
नातवाच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या केतन अग्रवालच्या आजोबांनी जीव सोडला, देवीचंद अग्रवालांचा मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
Ind vs Eng 2nd T20 : नाव घेणार नाही पण..., श्रेयस अय्यरने 'या' खेळाडूवर फोडले पराभवाचे खापर; सामन्यानंतर सगळं सांगून टाकलं
नाव घेणार नाही पण..., श्रेयस अय्यरने 'या' खेळाडूवर फोडले पराभवाचे खापर; सामन्यानंतर सगळं सांगून टाकलं
Balbharati Marathi Book: बालभारतीच्या इयत्ता सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील 'लोकनृत्य' धडा वादाच्या भोवऱ्यात? जेष्ठ साहित्यिक श्रीपाद जोशींचं मुख्यमंत्र्यांना पत्र; नेमकं प्रकरण काय?
बालभारतीच्या इयत्ता सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील 'लोकनृत्य' धडा वादाच्या भोवऱ्यात? जेष्ठ साहित्यिक श्रीपाद जोशींचं मुख्यमंत्र्यांना पत्र; नेमकं प्रकरण काय?
Tukaram Mundhe Pune FDA Raid: तुकाराम मुंढेंच्या खात्याची पुण्यातील बड्या हॉटेलवर कारवाई, 'मथुरा प्युअर व्हेज' बंद करण्याचे आदेश; 7 रेस्टॉरंट्सवर धडक कारवाई
तुकाराम मुंढेंच्या खात्याची पुण्यातील बड्या हॉटेलवर कारवाई, 'मथुरा प्युअर व्हेज' बंद करण्याचे आदेश; 7 रेस्टॉरंट्सवर धडक कारवाई
Pune News: तळेगावात रस्ता दुभंगला, पाण्याचा प्रचंड फवारा बाहेर आला, भयानक दृश्य पाहून नागरिक घाबरले, हादरवणारा व्हिडीओ समोर
तळेगावात रस्ता दुभंगला, पाण्याचा प्रचंड फवारा बाहेर आला, भयानक दृश्य पाहून नागरिक घाबरले, हादरवणारा व्हिडीओ समोर
Pune Rain Alert: पुणेकरांनो घराबाहेर पडताना काळजी घ्या! हवामान विभागाकडून रेड अलर्ट, लोणावळ्यात पावसाची तुफान बॅटिंग, 24 तासांत विक्रमी नोंद
पुणेकरांनो घराबाहेर पडताना काळजी घ्या! हवामान विभागाकडून रेड अलर्ट, लोणावळ्यात पावसाची तुफान बॅटिंग, 24 तासांत विक्रमी नोंद
Vyatipat Yog 2026 : जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच जुळून येणार अशुभ 'व्यतिपात योग'; 'या' 5 राशींना आतापासूनच सावधानतेचा इशारा
जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच जुळून येणार अशुभ 'व्यतिपात योग'; 'या' 5 राशींना आतापासूनच सावधानतेचा इशारा
Embed widget