Shirdi Lok Sabha constituency अहमदनगर : शिर्डी लोकसभा मतदारसंघ ( Shirdi  Lok Sabha constituency) हा राज्यातील राखीव मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. या लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महाविकास आघाडीच्या जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आहे. या ठिकाणी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Wakchaure) आणि वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षा रुपवते (Utkarsha Rupwate) शिर्डी लोकसभा मतदारसंघातील प्रमुख उमेदवार आहेत.शिर्डी लोकसभा मतदारसंघातील 1677335 मतदारांपैकी 1057298 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे विजयी झाले आहेत. भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेनेचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचा पराभव केला आहे. 

शिर्डी लोकसभा उमेदवार 

उमेदवार पक्ष निकाल
सदाशिव लोखंडे  शिवसेना   
भाऊसाहेब वाकचौरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे  विजय
उत्कर्षा रुपवते  वंचित बहुजन आघाडी   

 

तिरंगी लढत  कुणाला तारणार?

शिवसेनेचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे गेल्या दोन टर्मपासून शिर्डी लोकसभा मतादरसंघाचे खासदार म्हणून काम करत आहेत. दुसरीकडे  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शिर्डी लोकसभा मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेकडे गेल्यानं नाराज झालेल्या  काँग्रेसच्या उत्कर्षा रुपवते यांनी ऐनवेळी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करत उमेदवारी मिळवली. यामुळं या मतदारसंघाची निवडणूक तिरंगी झाली. तिरंगी लढतीत मतविभाजन होण्याची शक्यता अधिक असल्याचं स्पष्टपणे दिसून येतं. 


2014 पासून सदाशिव लोखंडे खासदार 

2014 साली सेनेचे तत्कालीन खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसकडून निवडणूक लढवली. वाकचौरे यांच्या पक्षांतरानंतर सेनेनं माजी आमदार सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी दिली.  अवघ्या 16 दिवसात सदाशिव लोखंडे खासदार झाले. 2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पुढे मागे विखे पाटील पितापूत्र भाजपमध्ये दाखल झाले.  2019 ला पुन्हा सदाशिव लोखंडे यांनाच शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली. तर त्यांच्या विरोधात श्रीरामपुरचे तत्कालीन विद्यमान आमदार भाऊसाहेब कांबळे यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाली होती. त्यावेळी देखील सदाशिव लोखंडे पुन्हा विजयी झाले होते.


लोखंडे वाकचौरे आमने सामने, पण... 

सदाशिव लोखंडे 2024 च्या लोकसभा निवडणुकीला उभे राहिले आहेत. लोखंडे यांच्या विरोधात भाऊसाहेब वाकचौरे आहेत. वंचितच्यावतीनं उत्कर्षा रुपवते रिंगणात आहेत. वरवर पाहता ही निवडणूक शिवसेनेचे दोन्ही गटाचे उमेदवार आणि वंचितच्या उत्कर्षा रुपवते यांच्यात वाटत असली तरी खरा संघर्ष काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात असल्याचं मानलं जातं. या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील महायुतीच्या घटक पक्षातील नाराज नेत्यांची समजूत घालण्यासाठी बैठका घेतल्याचं पाहायला मिळतं. दुसरीके उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारामध्ये देखील बाळासाहेब थोरात सक्रीय असल्याचं दिसून आलं होतं. 


लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ आणि आमदार 

शिर्डी लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये अकोले(एसटी)संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर, आणि नेवासा यांचा समावेश होते. महायुती आणि महाविकास आघाडीचा विचार केला असता दोन्ही बाजूनं तीन तीन आमदार आहेत. 

विधानसभा मतदारसंघ निहाय चित्र 

अकोले : किरण लहामटे राष्ट्रवादी काँग्रेस, पाठिंबा सदाशिव लोखंडे 
संगमनेर : बाळासाहेब थोरात, काँग्रेस,  पाठिंबा भाऊसाहेब वाकचौरे
शिर्डी : राधाकृष्ण विखे पाटील , भाजप, पाठिंबा सदाशिव लोखंडे 
कोपरगाव : आशुतोष काळे , राष्ट्रवादी काँग्रेस, सदाशिव लोखंडे 
श्रीरामपूर : लहू कानडे, काँग्रेस, भाऊसाहेब वाकचौरे 
नेवासा : शंकरराव गडाख, पाठिंबा भाऊसाहेब वाकचौरे

2024 च्या लोकसभा निवडणुकीत विधानसभा मतदारसंघ निहाय झालेले मतदान

अकोले : 155930
संगमनेर :184031
शिर्डी : 178716
कोपरगाव : 171059
श्रीरामपूर : 193605
नेवासा : 173957

एकूण मतदान : 1057298

संबंधित बातम्या 

Gondia-Bhandra Lok Sabha Result 2024 : भंडारा-गोंदिया मतदारसंघता कोण बाजी मारणार? भाजपचे सुनील मेंढे, की काँग्रेसचे पडोळे?

Nashik Lok Sabha Result 2024 : नाशिकमधून गोडसे की वाजे, कोण उधळणार गुलाल? वाचा लोकसभेचा निकाल एका क्लिकवर