Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Election Result 2024 : रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बाजी मारली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांचा पराभव झालाय. 24 व्या फेरीअखेर नारायण राणे 51 हजार 894 मतांनी आघाडीवर होते. नारायण राणे पाचव्या फेरीनंतर 4239 मतांनी आघाडीवर आहेत. पाचव्या फेरीनंतर विनायक राऊत पिछाडीवर पडले आहेत. राज्यातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हायहोल्टेज लढतीपैकी एक होता. कारण केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक विनायक राऊत यांच्यामध्ये ही लढत पाहायला मिळाली. नारायण राणे पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. शिवाय मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नारायण राणेंसाठी सभा घेतली होती, त्यामुळे ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनली होती. 


नारायण राणे पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात 


रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा : कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विनायक राऊतांनी बाजी मारली होती. दरम्यान, शिवसेनेत फूट पडल्यानंतर विनायक राऊत उद्धव ठाकरेंच्या पाठिशी राहिली. उद्धव ठाकरेंनी निष्ठा राखणाऱ्या विनायक राऊतांना तिसऱ्यांदा मैदानात उतरवले. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिंदेंच्या शिवसेनेकडून दावा केला जात असताना रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा खेचून आणली होती. दरम्यान मतदानाचा निकाल (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Election Result 2024) आता अवघ्या काही तासांवर असून या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार हे स्पष्ट होणार आहे.


विधानसभानिहाय मतदान 


चिपळूणमध्ये 2,69,791 मतदार आहेत. पैकी 1, 55,027 मतदारांनी मतदान केलं. 


रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात 2,83,552 मतदार आहेत. पैकी 1,72,139 मतदारांनी मतदान केलं. 


राजापूर विधानसभा मतदारसंघात 2,33,721 मतदार आहेत. पैकी 1,41,033 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. 


कणकवली मतदारसंघात 2,27,735 मतदार आहेत. पैकी 1,50,320 मतदारांनी मतदान केले. 


कुडाळ मतदारसंघात 2,12,360 मतदार असून 1,39,856 मतदारांनी मतदान केले.


सावंतवाडी या मतदारसंघात 2,24,471 मतदार असून 1,49,243 मतदारांनी आपल हक्क बजावला आहे. 


त्यामुळे एकूण मतदानाचा विचार करता 62.52 टक्के एकूण मतदान झाले आहे. तर, 0.5 टक्के इतकं पोस्टल मतदान झालं आहे. 


कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोण आमदार?


चिपळूण - शेखर  निकम
रत्नागिरी विधानसभा - उदय सामंत
राजापूर विधानसभा- राजन साळवी 
कणकवली मतदारसंघात- नितेश राणे 
कुडाळ मतदारसंघात - वैभव नाईक 
सावंतवाडी -  दीपक केसरकर 


2019 सालचा निवडणूक निकाल - (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Election Result 2019)


विनायक राऊत (शिवसेना) - 4,58,022


निलेश राणे  (महाराष्ट्र स्वाभिमानी) - 2,79,700


2019 साली विनायक राऊत विजयी 


स्थानिक राजकारण काय सांगतं?


रत्नागिरी - सिंधुदुर्ग या विधानसभा मतदारसंघातील गणितं फार महत्त्वाची आहेत. कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागात राणे कुटुंबाचं प्राबल्य दिसतं. तर काही भागात शिवसेनेचं. रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केल्यास राजापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना, रत्नागिरीमध्ये सामंत कुटुंबीय तर चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची ताकद दिसून येते. 


कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. पण शिवसेनेच्या फुटीनंतर पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी पक्ष बदलला. पण स्थानिक कार्यकर्ता मात्र जाग्यावर राहिल्याचं चित्र दिसलं. त्यामुळे या निवडणुकीत या सर्व गोष्टींचा प्रभाव दिसून आला. मुस्लिम समाज देखील राजकारणाबाबत उघडपणे भूमिका घेताना दिसून येऊ लागला. त्याचवेळी दलित समाजानं घेतलेली भूमिका आणि ख्रिश्चन समाजाची भूमिका देखील या मतदानामध्ये महत्त्वाची असणार आहे. रोजगार, विकास या मुद्यांवर या निवडणुकीत भर होता. शिवाय शिवसेनेत झालेली पक्षफुटी, रिफायनरीसारखे प्रकल्प आणि निष्ठा या मुद्यांभोवती देखील राजकारण फिरताना दिसून आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


Gondia-Bhandra Lok Sabha Result 2024 : भंडारा-गोंदिया मतदारसंघता कोण बाजी मारणार? भाजपचे सुनील मेंढे, की काँग्रेसचे पडोळे?