Anand Ingle :  अवघ्या काही तासांमध्ये देशाचा निकाल हा समोर येणार आहे. मागील काही वर्षांमध्ये विशेषत:महाराष्ट्रात झालेल्या  घडामोडींमुळे सगळ्या जनतेचं लक्ष या लोकसभा निवडणुकांकडे लागून राहिलं आहे. त्यातच अनेकांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य करत त्यांची मतं देखील मांडली आहेत. अभिनेते आनंद इंगळे (Anand Ingle) यांनी देखील लोकसभेच्या निकालाआधी सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केलं आहे. 


 सत्तबदल असो किंवा राजकारणात घडणाऱ्या घडामोडी असोत, राजकारणाचा अभिजात इतिहास असणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणाची स्थिती ही मागच्या काही वर्षात फारच बदलली. त्यावर आनंद इंगळे यांनी नुकतच तारांगणला मुलाखत दिली. त्यावर त्यांनी निकालाआधी लोकसभेच्या निवडणुकांवर भाष्य केलं आहे. 


आम्ही मुर्ख आहोत का? आनंद इंगळे


यंदा अंदाज लावणं खरचं खूप अवघड आहे. मीही अत्यंत सामान्य जनतेप्रमाणे आज महाराष्ट्राच्या राजकारणात काय होईल याचा अंदाज आपल लावू शकतो का? मी देखील माझं मत दिलंच आहे, पण यावेळी मला खरोखर अवघड असल्यासारखं वाटतंय. विचारधारेमध्ये फरक असू शकतो. तुमची एक विचारधारा, माझी एक विचारधारा असू शकते. मी  यावेळेस या विचारधारेला मत दिलं होतं. पण दुसरी विचारधारा निवडून आली. जास्त लोकांना ती विचारधारा निवडून यावी असं वाटतं होतं आणि त्यांनी तो राज्यकारभार केला इतकं सोप होतं. पण आता मी ज्या विचारधारेला मत देतो त्यातलच कुणीतरी दुसरीकडे जातात, परत येतात. काहीच कळत नाहीये. त्यामुळे जनतेसाठी हा सगळा गोंधळ झालाय. राजकीय विश्लेषकांना देखील याबबात सांगणं कठिण झालंय, तर आपण त्याबाबत काय सांगणार?


'राग येण्यापेक्षा असहाय्य वाटतं'


सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकजण वारंवार भूमिका बदलत असल्याचं चित्र आहे. त्यावर त्यांनी म्हटलं की, 'मला या गोष्टीचा राग येण्यापेक्षा मला फार असहाय्य वाटतं. या गोष्टीचा राग येऊन काय होणार आहे. वाटतं की, बाबांनो हे कशासाठी चाललं आहे? मला हे मनापासून वाटतं की, आम्ही काय मूर्ख आहोत का? इतकंपण नका ना करु. एका अख्ख्याच्या अख्खा प्रचंड मोठा वर्ग एका विचारधारेच्या मागे असताना त्याच्या विरुद्ध विचारधारेच्या पक्षाबरोबर हातमिळवणी करता. तुम्हाला अशावेळी लोक काय म्हणतील अशी भीती वाटत नाही का वाटत? त्यामुळे आता भूमिका बदलणाऱ्यांना भीती वाटत नाहीये', असं चित्र स्पष्ट दिसतंय. 


पुढे आनंद इंगळे यांनी म्हटलं की, 'यामध्ये आपल्याला माहितेय की खरी पंचायत ही कार्यकर्त्याची होते. पण मला असं वाटतं की, , सुजाण नागरिक म्हणून माझ्या हातात फक्त मत देणं एवढंच आहे. त्यामुळे मला राजकारणाविषयी घेणं-देणं नाही, असं बोलून चालणार नाही. कारण या सगळ्यांचा परिणाम लोकांना भोगायचा आहे, म्हणून म्हटलं राग नाही येत असहाय्य होतं.'  


ही बातमी वाचा : 


Mrunal Dusanis : अभिजीत, चिन्मय, संतोष की शशांक? मृणाल दुसानिसला आवडेल 'या' अभिनेत्यासोबत पुन्हा काम करायला