नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि महासचिव प्रियांका गांधी वाड्रा यांच्यावर शिया वफ्फ बोर्डाच्या अध्यक्षांनी तोफ डागली आहे. इंदिरा गांधींचं कुटुंब म्हणजेच राहुल आणि प्रियांका गांधी मुस्लिम आहेत, प्रियांका गांधी सुंदर असून त्यांना आपल्या चित्रपटात मुस्लिम महिलेची भूमिका दिली असती, असंही वसीम रिझवी म्हणाले.
शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी गांधी घराण्यावर टीकास्त्र सोडलं. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी मुस्लिम आहेत. प्रियांका गांधी सुंदर आहेत, त्यांना राजकारणात येण्याची गरज नव्हती. त्या यापूर्वीच या क्षेत्रात आल्या असत्या, तर आपल्या 'राम जन्मभूमी' या चित्रपटात त्यांना गफर खान यांच्या सूनेची भूमिका दिली असती, असंही रिझवी म्हणाले.
समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते आपला चित्रपट प्रदर्शित होऊ देत नाहीत. डिसेंबरमध्ये हा सिनेमा रिलीज होणार होता. प्रकरण कोर्टात गेल्यामुळे स्थगिती आली. आता हा सिनेमा 29 मार्चला प्रदर्शित होणार आहे, असं रिझवींनी सांगितलं.
मंदिर-मशिद वादावर तोडगा काढण्यासाठी मध्यस्थांची नेमणूक करणं योग्य आहे. निर्मोही आखाड्याच्या याचिकेला काही अर्थ नाही, असंही वसीम रिझवी म्हणाले.
प्रियांकांना सिनेमात मुस्लिम महिलेची भूमिका दिली असती, शिया वफ्फ बोर्ड अध्यक्षांची टीका
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Mar 2019 08:33 AM (IST)
प्रियांका गांधी सुंदर आहेत, त्यांना राजकारणात येण्याची गरज नव्हती. त्यांना मी 'राम जन्मभूमी' या चित्रपटात गफर खान यांच्या सूनेची भूमिका दिली असती, असं वसीम रिझवी म्हणाले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -