कोलकाता : कोलकाता नाईट रायडर्सनं किंग्स इलेव्हन पंजाबचा 28 धावांनी पराभव करत यंदाच्या आयपीएल मोसमातला सलग दुसरा विजय साजरा केला. या सामन्यात कोलकात्यानं पंजाबसमोर विजयासाठी 219 धावांचं मोठं आव्हान ठेवलं होतं. पण या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबच्या संघाला चार बाद 190 धावांचीच मजल मारता आली.
पंजाबच्या मयांक अगरवालनं 58 तर डेव्हिड मिलरनं नाबाद 59 धावांची खेळी केली. पण तरीही पंजाबचा विजय 28 धावांनी दूर राहिला. कोलकात्याकडून आंद्रे रसेलनं दोन तर कॉलम फर्ग्युसन आणि पियुष चावलानं प्रत्येकी एका फलंदाजाला माघारी धाडलं.
त्याआधी रॉबिन उथप्पा आणि नितीश राणाच्या दमदार अर्धशतकांमुळे कोलकात्यानं पंजाबसमोर चार बाद 218 धावांचा डोंगर उभारला. यंदाच्या मोसमातली ही आतापर्यंतची सर्वाधिक धावसंख्या ठरली. कोलकात्याच्या नितीश राणानं स्पर्धेतलं सलग दुसरं अर्धशतक साजरं केलं. त्यानं 34 चेंडूत 2 चौकार आणि सात षटकारांसह 63 धावांची खेळी केली. तर रॉबिन उथप्पानं 50 चेंडूत नाबाद 67 धावा फटकावल्या. त्यानंतर आलेल्या आंद्रे रसेलनं अवघ्या 17 चेंडूत 48 धावा कुटल्या. त्याच्या या खेळीत तीन चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता.
कोलकाता नाईट रायडर्स विजयी, किंग्स इलेव्हन पंजाबचा 28 धावांनी पराभव
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Mar 2019 12:12 AM (IST)
या सामन्यात कोलकात्यानं पंजाबसमोर विजयासाठी 219 धावांचं मोठं आव्हान ठेवलं होतं. पण या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबच्या संघाला चार बाद 190 धावांचीच मजल मारता आली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -