Sharad Pawar : पुढच्या पिढीची गरज आहे, त्यासाठी युगेंद्रला निवडून द्या; शरद पवारांचे बारामतीत आवाहन
Sharad Pawar, बारामती : युगेंद्र पवार यांना निवडून द्या, असं आवाहन खासदार शरद पवार यांनी बारामतीत केले आहे.
Sharad Pawar, बारामती : "आधी इथल्या वडिलधाऱ्यांनी मला आमदार बणवल , मी काम केले . त्यानंतर अजित पवारांना निवडून दिले. अजित पवारांना संधी दिली. त्यांनी काम केलं, हे मी नाकारत नाही. युगेंद्र उच्च विद्याभुषित आहे, परदेशात शिक्षण घेतलंय. त्यांच्यामध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्याची धमक आहे. युगेंद्र ठिकठिकाणी फिरुन माहिती घेतायत , जाणून घेतायत ही त्यांची काम करण्याची पद्धत आहे. आता पुढच्या पिढीची गरज आहे त्यासाठी युगेंद्रला निवडून द्या", असं आवाहन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले. ते बारामती येथील सभेत बोलत होते.
शरद पवार म्हणाले, महाराष्ट्र काय चीज आहे हे देशाला लोकसभा निवडणूकीने दाखवून दिले.पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत होते की 400 जागा निवडून द्या . कारण त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलायची होती. तुम्ही आम्हाला शक्ती दिली. लोकसभा निवडणुकीत तुम्ही सुप्रियाताईंना विजयी केलं. महाराष्ट्रात 48 पैकी 31 खासदार तुम्ही निवडून दिले.
बहीण लाडकी आहे, त्यांचा सन्मान जरुर करा. पण एका बाजूला लाडकी बहीण म्हणायचं दुसरीकडे यांच्या कालखंडात महिलांवरील अत्याचार झाल्याचे प्रमाण जास्त आहे. गेल्या 2 वर्षात 67 हजार भगिनींवर अत्याचार झाले आहेत. लाडकी बहीण म्हणायचं दुसऱ्या बाजूला ही स्थिती आहे. महिला आणि मुली बेपत्ता आहेत. 64 हजार मुली महाराष्ट्रात बेपत्ता आहेत. जे लाडकी बहीण म्हणतात, त्यांनी 64 हजार मुलींचं रक्षण केल का? ही सांगण्याची धमक त्यांच्यामध्ये नाही, अशी टीका शरद पवारांनी केली.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्यांचा काय गुन्हा होता त्यांचा? शेतीमालाची किंमत मिळत नाही, कर्जबाजारी पणा वाढलाय. बारामती हा शेतकर्यांचा परिसर आहे. महाराष्ट्रात वीस हजाराहून अधिक शेतकर्यांनी आत्महत्या केल्या कारण शेतमालाला भाव नव्हता. विदर्भात शेतमालाच्या भावाचा प्रश्न, सोयाबीनच्या प्रश्न गंभीर आहे. नरेंद्र मोदींनी शेतकर्यांना मदत केली पाहिजे. केंद्र सरकारने उद्योगपतींचे अठरा हजार कोटी रुपयांचं कर्ज माफ केले पण शेतकऱ्यांचे दोन हजार रुपये ते माफ करत नाहीत. मी बारामती , जेजुरी , इंदापुर , पुणे, रांजणगाव या ठिकाणी एम आय डी सी काढली आणि हजारो लोकांना रोजगार मिळाला. पण आत्ता सत्तेत असलेल्यांनी काय केले तर सगळे उद्योग गुजरातला पाठवले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर