एक्स्प्लोर

आमच्या पक्षाचं स्वतंत्र आस्तित्व, सुशीलकुमार शिंदेंच्या विलिनीकरणाच्या वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया

नवीन ट्रक घेतला तर त्यावर लिंबू आणि मिरची टांगून ठेवतात. जेणेकरुन त्या ट्रकला शाप लागणार नाही. पण नेमकं राफेलला कशाचा शाप लागेल? असा सवाल करत त्यांना भीती वाटत असेल त्यामुळे त्यांनी लिंबू ठेवले असेल तर धन्य आहे, असे पवार म्हणाले.

मुंबई :  मी राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष आहे. मला पक्षाच्या निर्णयाची अधिक माहिती आहे. आमच्या पक्षाचं स्वतंत्र आस्तित्व आहे आणि आम्ही शिंदे साहेबांपेक्षा राष्ट्रवादी जास्त जाणतो, असे म्हणत सुशीलकुमार शिंदे यांनी केलेल्या विलिनीकरणाच्या वक्तव्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर दिले आहे. पवारांच्या या भूमिकेनंतर दोन्ही पक्ष विलिनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. यवतमाळमध्ये आयोजित सभेत ते बोलत होते. सरकार सत्तेचा गैरवापर करून राजकीय व्यक्तींची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न आणि विरोधकांना नाउमेद करण्याचा प्रयत्न सरकार सीबीआय, आयबीच्या माध्यमातून पुरेपूर करत असल्याचा टीका शरद पवार यांनी केली. विशेष म्हणजे या देशामध्ये सांप्रदायिक विचारातून सत्ता आणि मतं प्राप्त करून घेण्याची भूमिका आजच्या राज्यकर्त्यांची आहे.  काही ठिकाणी झुंडशाही होत आहे, अशी टीकाही शरद पवार यांनी केली. यावेळी ते म्हणाले की, ज्याच्याशी माझा संबंध नाही, त्या विषयात माझ्यावर गुन्हा दाखल केला. त्यात माझं नाव गोवलं. मग फरार दाखवण्यापेक्षा मीच येतो असे सांगितले. या राज्यात निर्दोष माणसाला गुन्हे दाखल करून अटक केली जातेय, असेही ते म्हणाले. मी संरक्षण मंत्री असतांना मी राफेलच्या कंपनीत तत्कालीन सेक्रेटरी व्होरा यांच्या समवेत गेलो होतो.  राफेल हे उत्तम विमान आहे, यात शंका नाही, आम्हाला राफेल योग्य वाटलं. तपासणी करुन आता हे विमान खरेदी केले गेले याचे स्वागत करतो. पण ज्या पद्धतीने राफेलच्या चाकाखाली लिंबू ठेवले ते चुकीचे आहे, असे ते म्हणाले. नवीन ट्रक घेतला तर त्यावर लिंबू आणि मिरची टांगून ठेवतात. जेणेकरुन त्या ट्रकला शाप लागणार नाही. पण नेमकं राफेलला कशाचा शाप लागेल? असा सवाल करत  त्यांना भीती वाटत असेल त्यामुळे त्यांनी लिंबू ठेवले असेल तर धन्य आहे, असे पवार म्हणाले. पवार म्हणाले की, निवडणूक काळात 10 रुपयात जेवण देण्याची घोषणा उद्धव ठाकरे करत आहेत. केंद्रात आणि राज्यात त्यांचीच सत्ता आहे मग हे आजपर्यंत का केले नाही. ही घोषणा म्हणजे बोलाची कढी आणि बोलाचा भात आहे, असे पवार म्हणाले. नागपूर वगळता या राज्यातील रस्त्यांवर प्रचंड प्रमाणावर खड्डे आहेत. या प्रश्नाची सोडवणूक करण्याची कुवत नाही, असेही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Rajasthan Results : खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
पत्नीसह आई वडिलांनीही नाकारलं! भाजपच्या उमेदवाराला मिळालं फक्त 1 मत, दारुन पराभव झाल्यानं देशभर चर्चा
पत्नीसह आई वडिलांनीही नाकारलं! भाजपच्या उमेदवाराला मिळालं फक्त 1 मत, दारुन पराभव झाल्यानं देशभर चर्चा
Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!

व्हिडीओ

Amit Shah On Hindi Language : भाषा, 'पाप' आणि राजकीय माप |Amit Shah On Hindi Language
Manoj Jarange Mumbai Andolan | लढणार एकटा, निर्धार पक्का | Special Report ABP Majha
Sangli AdityaRaj Patwardhan : आदित्यराज पटवर्धन यांच्या वारसाहक्कावरून वाद Special Report
Disha Salian Case CBI : सीबीआयचा FIR, आरोपीच्या पिंजऱ्यात कोण? Special Report
Manoj Jarange Mumbai Morcha : मी एकटा मुंबईत येतो, देवेंद्र फडणवीस परवानगी देणार का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajasthan Results : खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
BLOG : शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणपती बाप्पा साता समुद्रपार; पूर्व आफ्रिकेतही जल्लोषात स्वागत, संभाजीनगरहून ज्योतिषाचार्य पुजेला
गणपती बाप्पा साता समुद्रपार; पूर्व आफ्रिकेतही जल्लोषात स्वागत, संभाजीनगरहून ज्योतिषाचार्य पुजेला
पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद; पांडुरंगाच्या मूर्तीसाठी लेपन प्रक्रियेला अखेर लागला मुहूर्त
पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद; पांडुरंगाच्या मूर्तीसाठी लेपन प्रक्रियेला अखेर लागला मुहूर्त
Embed widget