एक्स्प्लोर

बालकांनी काहीही विधानं केली तर ज्येष्ठांनी त्याकडे लक्ष देऊ नये, शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

पवार म्हणाले की, फडणवीस हे बालबुद्धीला शोभेल अशी विधानं करत आहेत. मी त्यांच्या पक्षातील नेत्यांविरोधात निवडणूक लढवल्या आहेत. त्यावेळी त्यांची अनामत रक्कम जप्त झाली आहे, हा त्यांना कदाचित माहिती नसेल, असे ते म्हणाले.

मुंबई : शरद पवारांनी पवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानाचा शरद पवारांनी खरपूस समाचार घेतला आहे. बालकांनी काहीही विधानं केली तर ज्येष्ठांनी त्याकडे लक्ष देऊ नये, असा टोला  शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे. आज शरद पवार यांनी मुंबई येथील विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर देशातील महत्त्वाच्या काही मुद्द्यावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले की, फडणवीस हे बालबुद्धीला शोभेल अशी विधानं करत आहेत. मी त्यांच्या पक्षातील नेत्यांविरोधात निवडणूक लढवल्या आहेत. त्यावेळी त्यांची अनामत रक्कम जप्त झाली आहे, हा त्यांना कदाचित माहिती नसेल, असे ते म्हणाले. मुंबईतील सर्व पुलांची श्वेतपत्रिका जाहीर करा : शरद पवार मुंबईतील सर्व पुलांची श्वेतपत्रिका जाहीर करावी अशी मागणी शरद पवार यांनी यावेळी केली. मुंबईतील या पुलाचे ऑडीट झाले होते. त्याचीच चौकशी करण्याची मागणी पवार यांनी यावेळी केली. मध्य रेल्वेने 11 नोव्हेंबर 2015 ला राज्यसरकारला पत्र दिलं होतं. या पत्रात मुंबईतील ओव्हरब्रिजच्या दुरावस्थेची माहिती दिली होती. हे पत्र शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत वाचून दाखवले. या पत्रानंतरही सरकारने किंवा महानगरपालिकेने गांभीर्याने घेतले नाही याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. मुंबईत काल अपघात झाला तो अत्यंत चिंतेचा विषय आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. या राजधानीत विरार ते चर्चगेट, कर्जत ते सीएसटी रोज 1 कोटी लोक प्रवास करतात. या मार्गावर अनेक लोकांचे विविध कारणाने अपघात होतात. दिवसाला 15 ते 20 अपघात होतात. वर्षाला 3 हजार लोकांचा मृत्यु होतो. महिन्याला 2-3 हजार प्रवासी जखमी होतात. मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. सर्वांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बदल करण्याची गरज आहे. पहिल्यांदा रेल्वे स्टेशनची सुधारणा करणे गरजेचे आहे. असे शरद पवार म्हणाले. दिवसेंदिवस रेल्वे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यायला हवे असे सांगतानाच बुलेट ट्रेनपेक्षा मुंबईतील रेल्वे पुल आणि मुंबई लोकलची अवस्था सुधारावी अशी मागणी केली. आता बुलेट ट्रेन होणार आहे. यावर सव्वा लाख कोटी खर्च होणार आहे. आमचे सर्वांचे मत आहे की, सरकारने तो पैसा मुंबई लोकल आणि इतर रेल्वे सर्कलवर खर्च करावा अशी मागणीही केली. याशिवाय मुंबई ते दिल्ली, दिल्ली ते कोलकाता, कोलकाता ते चेन्नई, चेन्नई ते मुंबई या मार्गाचे जाळे सक्षम करावे असेही  पवार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
Maharashtra Vidhan Parishad Election: पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
Raju Shetti on Gokul Election: 'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली
'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली!

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
Rohit Pawar MPSC Student Protest: एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
Gold Rate : सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, एका तोळ्याचा दर दीड लाख रुपयांवर, ट्रम्प यांच्या एका घोषणेनं ट्रेंड बदलला
सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, एका तोळ्याचा दर दीड लाख रुपयांवर, ट्रम्प यांच्या एका घोषणेनं ट्रेंड बदलला
Raj Thackeray on Delhi CJP Protest: या देशाने सगळ्यांचा माज उतरवलाय! मोदी-शाहांची पराकोटीची हुकूमशाही, बेबंदशाहीला उखडून काढलं पाहिजे; राज ठाकरेंची खरमरीत पोस्ट
या देशाने सगळ्यांचा माज उतरवलाय! मोदी-शाहांची पराकोटीची हुकूमशाही, बेबंदशाहीला उखडून काढलं पाहिजे; राज ठाकरेंची खरमरीत पोस्ट
Abhijeet Dipke Family : अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'
Abhijeet Dipke Family : अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
Embed widget