एक्स्प्लोर
गुजरात एक्स्प्रेसमधून साडे सात कोटींचा ऐवज जप्त, यंदाच्या निवडणूक हंगामातील रेल्वे पोलिसांची सर्वात मोठी कारवाई
या प्रकरणी पोलिसांनी 19 जणांना ताब्यात घेतलं आहे. ही रोकड आणि दागिने सुरत येथील कुरिअर कंपनीची असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी चौकशी सुरु आहे.
मुंबई : राज्यात निवडणुकांची आचारसंहिता लागू होताचं निवडणूक आयोग आणि राज्यातील पोलिसांनी अनधिकृतपणे होणाऱ्या पैशांच्या व्यवहारांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. याच पार्श्वभूमीवर बोरीवली रेल्वे पोलिसांनी तब्बल साडे सात कोटींचा ऐवज जप्त केला आहे. यंदाच्या निवडणूक हंगामातील रेल्वे पोलिसांनी केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे.
मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकांतून गुजरात एक्स्प्रेसमधून अनधिकृतपणे कोट्यवधींची रक्कम नेण्यात येणार असल्याची माहिती बोरीवली रेल्वे पोलिसांना मिळाली. यानुसार बोरीवली रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भास्कर पवार यांनी मंगळवारी रात्री बोरीवली स्थानकात सापळा रचला. यावेळी गुजरात मेलमधील डब्यांची तपासणी केली. तपासणीत तब्बल 35 बॅगा भरुन कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. यात 10 लाखांच्या रोख रकमेसह हिऱ्यांचे हार, सोन्याचे दागिने यांचा समावेश होता, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.
Aditya Thackeray | आदित्य ठाकरे कोट्यधीश, किती संपत्ती आहे आदित्य ठाकरेंच्या नावे? | Mumbai | ABP Majha
या प्रकरणी पोलिसांनी 19 जणांना ताब्यात घेतलं आहे. ही रोकड आणि दागिने सुरत येथील कुरिअर कंपनीची असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी चौकशी सुरु आहे. विधानसभा निवडणूक आचारसंहितेनुसार, जप्त केलेल्या 35 बॅगांची संपूर्ण माहिती मुंबईतील आयकर विभागाला देण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement