एक्स्प्लोर

सावंतवाडी विधानसभा | मंत्री दीपक केसरकर इतिहास बदलून हॅटट्रिक करणार?

सध्याचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर हे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार असून ते या अगोदर दोन वेळा निवडून आले आहेत. मात्र तिसऱ्यांदा आमदार बनण्याची संधी त्यांना या मतदारसंघातून मिळते का? याकडे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

सावंतवाडी मतदारसंघात सावंतवाडी, वेंगुर्ले, दोडामार्ग असे तीन तालुक्यांचा समावेश आहे. सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचा इतिहास पाहता 1990 पासून 2014 पर्यंत या मतदारसंघात दोन वेळा निवडून आलेल्या उमेदवाराला तिसऱ्या वेळी मात्र पराभवाचा सामना करावा लागतो. सध्याचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर हे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार असून ते या अगोदर दोन वेळा निवडून आले आहेत. मात्र तिसऱ्यांदा आमदार बनण्याची संधी त्यांना या मतदारसंघातून मिळते का? याकडे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेनेकडून या मतदार संघात पुन्हा एकदा दीपक केसरकर यांना उमेदवारी दिली जाणार आहे. त्यामुळे दीपक केसरकर 1990 ते 2014 पर्यंतचा इतिहास बदलणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. 1990 पूर्वी शिवरामराजे भोसले हे चार वेळा आमदार म्हणून निवडून आले. याच मतदारसंघात प्रतापराव भोसले आणि जयानंद मठकर हे एक वेळा आमदार निवडून आले. या मतदारसंघात दिपक केसरकर हे तिसर्‍या वेळी निवडणुकीला सामोरे जाणार असून त्यांची प्रतिष्ठा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात पणाला लागलेली आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रादेशिक प्रशासकीय विभाग बदलले गेले आणि त्यानंतरच सीमा तयार झाल्या त्यात राज्यातही बदली. 1950 मध्ये प्रजासत्ताक दिन करण्यात आला. त्यावेळी सावंतवाडी संस्थानचा अंमल होता. 1962 साली सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची पहिली निवडणूक झाली. त्या वेळी काँग्रेसचे शिवराम सावंत खेमराज भोसले यांना सुमारे 25 हजाराहून अधिक मतदान होऊन ते निवडून झाले. 2014 च्या निवडणुकीत शिवसेना भाजपची युती तुटली. दोन्ही पक्षाने स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या. त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी यांची आघाडी तुटली. त्यांनीही स्वतंत्र निवडणुका लढवल्या. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मनसेने आपला उमेदवार उभा केला होता. 2014 मध्ये या पंचरंगी लढतीमध्ये सध्याचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर 70,902  मते मिळवून विजयी झाले होते. मतदारसंघाच्या पुनर्रचनेत 2009 मध्ये मतदारसंघात वेंगुर्ला तालुक्यात समाविष्ट करण्यात आला. त्यावेळी सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले असे तीन तालुक्याचे सावंतवाडी मतदारसंघ बनला. कुडाळ विधानसभा मतदारसंघ | नारायण राणे आपला गड परत मिळवणार का? 2019 च्या निवडणुकीत दीपक केसरकर शिवसेनेकडून उमेदवार रिंगणात उतरणार आहेत. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून संजू परब उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून राष्ट्रवादीच्या अर्चना घारे व एम. के. गावडे यांची नावे चर्चेत आहेत.  दीपक केसरकर यांचे खंदे समर्थक सावंतवाडी नगराध्यक्ष बबन साळगावकर या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. मात्र ते कोणत्या पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरतील हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. भाजपकडून राजन तेली यांनी आपल्याला या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र यावेळी मनसे आपल्या या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभा करणार की नाही हेही पाहणे महत्त्वाचे आहे. 1990 पासून आतापर्यंतचा इतिहास 1990 आणि 1995 मध्ये काँग्रेसचे प्रवीण भोसले काँग्रेसकडून दोन्ही वेळा निवडून आले. 1999 आणि 2014 मध्ये शिवराम  दळवी हे शिवसेनेकडून निवडून आले होते. 2009 आणि 2014 यावेळी दीपक केसरकर हे दोन्ही वेळा निवडून आले. 1990 ते 2014 पर्यंत इतिहास पाहिला तर दोन वेळा निवडून आलेले उमेदवार पुन्हा निवडून आलेले नाहीत. 1990 पासून 2014 पर्यंत या मतदारसंघात दोन वेळाच उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे दीपक केसरकर या मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून येतात की नाही हे पाहणं महत्त्वाचं राहील. गेल्या लोकसभेचे मताधिक्य पाहता दीपक केसरकर हे या मतदारसंघातून निवडून येतील असे मतदानाचे आकडे सांगतात. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ 2009 दिपक केसरकर (राष्ट्रवादी) 63,430 शिवराम  दळवी (शिवसेना) 45,012 प्रवीण भोसले (अपक्ष) 19,364 बाबूराव धुरीजद (धर्मनिरपेक्ष) 1792 सुनील पेडणेकर (बसपा) 1781 सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ 2014 दिपक केसरकर (शिवसेना ) 70,902 राजन तेली (भाजप) 29,710 चंद्रकांत गावडे (काँगेस) 25,376 सुरेश दळवी (राष्ट्रवादी) 9,029 परशुराम उपरकर (मनसे) 5,573 सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ 2019 इच्छुक उमेदवार दीपक केसरकर (शिवसेना) राजन तेली (भाजप) संजू परब (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष) अर्चना घारे (राष्ट्रवादी) एम. के. गावडे (राष्ट्रवादी) बबन साळगावकर, सावंतवाडी नगराध्यक्ष (पक्ष ठरलेला नाही) जाणून घ्या या मतदारसंघाविषयी

महत्त्वाच्या बातम्या

UP Vidhansabha Election: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग; समाजवादी पक्षाची काँग्रेसला 26 जागांची ऑफर, कशी आहेत राजकीय समीकरणं?
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग; समाजवादी पक्षाची काँग्रेसला 26 जागांची ऑफर, कशी आहेत राजकीय समीकरणं?
BJP-SAD Alliance For Punjab Elections : मोठी बातमी : जो बडा भाई होता है, वही चीफ मिनिस्टर होता है, अमित शाहांचा अकाली दलाला शब्द, पंजाबमध्ये भाजप धाकट्या भावाच्या भूमिकेत!
मोठी बातमी : जो बडा भाई होता है, वही चीफ मिनिस्टर होता है, अमित शाहांचा अकाली दलाला शब्द, पंजाबमध्ये भाजप धाकट्या भावाच्या भूमिकेत!
BJP-SAD Alliance Punjab : मोठी बातमी : पंजाबमध्ये विभागलेले जुने मित्र पुन्हा एकत्र, भाजप-अकाली दलाची युती, अमित शाहा म्हणाले, जुन्या मित्राचं स्वागत!
मोठी बातमी : पंजाबमध्ये विभागलेले जुने मित्र पुन्हा एकत्र, भाजप-अकाली दलाची युती, अमित शाहा म्हणाले, जुन्या मित्राचं स्वागत!
Rajasthan Panchayat Election Results 2026 : राजस्थानच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी; सत्ताधारी भाजपाचा मोठा पराभव, ग्रामीण भागात काँग्रेसची पकड पुन्हा मजबूत
राजस्थानच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी; सत्ताधारी भाजपाचा मोठा पराभव, ग्रामीण भागात काँग्रेसची पकड पुन्हा मजबूत

व्हिडीओ

Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप
Sanjay Raut vs Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊतांचे गंभीर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Silver Rate : चांदी तीन महिन्यात 1 लाख रुपयांनी स्वस्त, आता चांदीचे दर महागणार की आणखी स्वस्त होणार, तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या 
चांदी तीन महिन्यात 1 लाख रुपयांनी स्वस्त, आता चांदीचे दर महागणार की आणखी स्वस्त होणार?
Chikkodi Belagaum : 'संबंध ठेव, नाहीतर अत्याचाराचा गुन्हा दाखल करेन'; धमकीला कंटाळून प्रियकराने 38 वर्षीय विवाहित प्रेयसीचा जंगलात नेऊन काटा काढला
'संबंध ठेव, नाहीतर अत्याचाराचा गुन्हा दाखल करेन'; धमकीला कंटाळून प्रियकराने 38 वर्षीय विवाहित प्रेयसीचा जंगलात नेऊन काटा काढला
Ramayana : मोठी बातमी! बॉक्स ऑफिसवर 1700 कोटींचा धुमाकूळ, आता 'रामायण' 'या' ओटीटीवर दिसणार
मोठी बातमी! बॉक्स ऑफिसवर 1700 कोटींचा धुमाकूळ, आता 'रामायण' 'या' ओटीटीवर दिसणार
भिवंडीत शोरमा खाल्ल्याने विषबाधा, 34 जणांवर उपचार सुरु, लहान मुलांचाही समावेश, ए.के. शोरमा दुकानावर महापालिकेची तोडक कारवाई!
भिवंडीत शोरमा खाल्ल्याने विषबाधा, 34 जणांवर उपचार सुरु, महापालिकेकडून तोडक कारवाई सुरु
Vaibhav Sooryavanshi :  एक-दोन बॉल खेळल्यानंतरच मला..., 204 धावांची वादळी खेळी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीची पहिली प्रतिक्रिया, बेबी बॉस काय म्हणाला?
एक-दोन बॉल खेळताच विकेटचा अंदाज, 204 धावा करणारा वैभव सूर्यवंशी म्हणाला...
ऑक्सफोर्डमध्ये भाषण द्यायला जाणाऱ्या सौरव दासला दिल्ली विमानतळावर अडवलं; अभिजीत दिपकेंची संतप्त प्रतिक्रिया, हजारो कोटींचा घोटाळा केला असता...
ऑक्सफोर्डमध्ये भाषण द्यायला जाणाऱ्या सौरव दासला दिल्ली विमानतळावर अडवलं; अभिजीत दिपकेंची संतप्त प्रतिक्रिया, हजारो कोटींचा घोटाळा केला असता...
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीचं 52 बॉलमध्ये वादळी विक्रमी द्विशतक, 7 चौकार, 28 षटकार ठोकले
वैभव सूर्यवंशीचं 52 बॉलमध्ये वादळी विक्रमी द्विशतक, 7 चौकार, 28 षटकार ठोकले
Gold Rate : सोने एका महिन्यात 18530 रुपयांनी स्वस्त, सोने दरासाठी 3 तारखा महत्त्वाच्या, सोनं महागणार की स्वस्त होणार?
सोने एका महिन्यात 18530 रुपयांनी स्वस्त, येत्या काळात सोनं महागणार की स्वस्त होणार?
Embed widget