Sawantwadi Assembly Constituency 2024 : सावंतवाडी मतदारसंघात दीपक केसरकर यांचा दणक्यात विजय, राज तेली यांचा 39,899 मतांनी पराभव
Sawantwadi Assembly Constituency 2024 : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार दीपक केसरकर विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राजन तेली हे रिंगणात उतरणार आहेत.
Sawantwadi Assembly Constituency 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आज (23 नोव्हेंबर) 288 विधानसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार दीपक केसरकर हे चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उभे होते आणि त्यांचा दणकून विजय झाला आहे. दीपक केसरकर यांचा 39,899 मतांनी विजय झाला आहे. त्यांच्यासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राजन तेली हे उमेदवार उभे होते.
शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर दीपक केसरकर हे पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याने त्यांचा राजकीय कस लागणार आहे. लोकसभेला नारायण राणे निवडून देण्यासाठी सावंतवाडी मतदारसंघात दीपक केसरकर हे जोमाने फिरले होते. त्यामुळे दीपक केसरकर आता विधानसभेला राणेंवर मदार ठेवून निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. सावंतवाडी मतदारसंघात महायुतीची जेवढी ताकद आहे तेवढीच महाविकास आघाडीची देखील ताकद असल्याने सावंतवाडी मतदारसंघात विधानसभेचे निवडणूक ही तुल्यबळ होणार आहे.
विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी 2009 ला पहिल्यांदा विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून लढवली होती. सावंतवाडीतून ते पहिल्यांदा 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेत निवडून गेले. त्यानंतर 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांपू्र्वी केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला होता. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत केसरकर यांनी नारायण राणे यांचे पूत्र आणि काँग्रेसचे रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार निलेश राणे यांना विरोध केला. ही लढाई नारायण राणे या व्यक्तीविरुद्ध नाही तर राणे या प्रवृत्तीच्या विरोधात आहे असं सांगत आपण राष्ट्रवादी सोडण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे त्यावेळी दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले होते. अखेर त्यांनी 2014 मध्ये राष्ट्रवादी सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला.
2014 मध्ये झालेली विधानसभा निवडणूक दीपक केसरकर यांनी शिवसेनेकडून लढवली. त्यावेळी त्यांनी प्रतिस्पर्धी भाजपाचे उमेदवार राजन तेली यांचा पराभव केला. दीपक केसरकर यांना 70902 मत मिळवून 41 हजारांहून अधिक मताधिक्याने केसरकर विधानसभेवर सलग दुसऱ्यांदा निवडून गेले होते.
2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपा शिवसेनेची युती होती. युतीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेला मिळाल्याने दीपक केसरकर हे शिवसेनेचे उमेदवार होते. यावेळी राजन तेली यांनी अपक्ष निवडणूक लढवली. केसकरांना 69784 मते मिळाली, तर तेली यांना 56556 मते मिळाली. केसरकर यांना 13 हजार मतांची आघाडी मिळाली. सावंतवाडीतून ते सलग तिसऱ्यांदा विधानसभेवर निवडून गेले.
दीपक केसरकर यांनी 2014, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राजन तेली यांचा पराभव केला. आता तिसऱ्यांदा राजन तेली निवडणूक लढविण्याची तयारी करत आहेत. केसरकर हे शिवसेना-भाजप महायुतीचे संभाव्य उमेदवार असतील. त्यामुळे भाजपचे माजी आमदार राजन तेली नेमकी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. भाजपमध्ये राहून तेली यांनी केसरकर निष्क्रिय असल्याची तसेच त्यांनी शिक्षण मंत्री म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याला न्याय दिला नसल्याची टीका केली. तसेच भाजपाचे नेते, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सावंतवाडीत भाजपाची संघटना बांधणी हाती घेतली आहे. रवींद्र चव्हाण आणि केसरकर यांचे सूर जुळले नसल्याने महायुतीतील खदखद कायम आहे. भाजप नेते या मतदारसंघावर दावा करत आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे.