एक्स्प्लोर

Satara Vidhansabha Results 2024 : साताऱ्याचा बालेकिल्ला महायुतीच्या ताब्यात, महायुतीचा मविआला 8-0 असा क्लीन स्वीप

Satara Vidhansabha Results 2024 : सातारा जिल्ह्यात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत. या जिल्ह्यात भाजपचे चार, शिवसेनेचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार निवडून आले आहेत.

Satara Vidhansabha Results 2024 : सातारा: जिल्ह्यात विधानसभेचे 8 मतदारसंघ आहेत.  फलटण, वाई, कोरेगाव,माण, कराड उत्तर, कराड दक्षिण, पाटण आणि सातारा या मतदारसंघांचा समावेश होतो. सातारा जिल्ह्यातील 8 जागांसाठी मतदान पार पडलं आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची तुलना केली असता साताऱ्यातील सर्व मतदारसंघांमध्ये मतदानाचा टक्का वाढलेला आहे.सातारा जिल्ह्यात एकूण आठ मतदारसंघांमध्ये 71.95 टक्के मतदान झालं आहे.वाढलेलं मतदान कुणाच्या बाजूनं जाणार याकडे सर्वाचंं लक्ष लागलं आहे. सातारा जिल्ह्यातील आठ मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. 

सातारा जिल्ह्यातील विजयी उमेदवारांची नावं :
फलटण : सचिन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस
वाई : मकरंद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस
कोरेगाव: महेश शिंदे,शिवसेना
माण : जयकुमार गोरे, भाजप
कराड उत्तर : मनोज घोरपडे, भाजप 
कराड दक्षिण : अतुल भोसले, भाजप
पाटण : शंभूराज देसाई, शिवसेना
सातारा : शिवेंद्रराजे भोसले, भाजप

फलटण विधानसभा मतदारसंघ लोकसभेला माढा मतदारसंघात येतो. फलटणमध्ये विधानसभेला 241376 मतदान झालं आहे. फलटणला राष्ट्रवादी काँग्रेसकडून सचिन पाटील विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून आमदार दीपक चव्हाण निवडणुकीच्या रिंगणात आहेत.  

वाई विधानसभा मतदारसंघ सातारा लोकसभा मतदारसंघात येतो. विधानसभा निवडणुकीत 234544 इतकं मतदान झालं आहे. वाईची लढत तिरंगी झाली आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मकरंद पाटील रिंगणात असून त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या अरुणादेवी पिसाळ निवडणूक लढवत आहेत. अपक्ष उमेदवार म्हणून पुरुषोत्तम जाधव रिंगणात आहेत. 

कोरेगाव मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत इथं मतांची टक्केवारी वाढलेली आहे. कोरेगावात 249311 इतकं मतदान झालं आहे. इथं शिवसेना आमदार महेश शिंदे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांचं आव्हान आहे.  

माण विधानसभा मतदारसंघात लोकसभेच्या तुलनेत विधानसभेला मतदानात वाढ झाली आहे. माण विधानसभा मतदारसंघात 259603 इतकं मतदान झालं आहे. माण विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार जयकुमार गोरे भाजपकडून लढत असून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रभाकर घार्गे यांचं आव्हान आहे. 

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात  288830 इतकं मतदान झालं आहे. या ठिकाणी विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून रिंगणात आहेत. त्यांना भाजपच्या मनोज घोरपडे यांचं आव्हान आहे.  

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि भाजप नेते अतुल भोसले यांच्यात तिसऱ्यांदा लढत होत आहे. यापूर्वी दोनवेळा पृथ्वीराज चव्हाण यांनी अतुल भोसले यांचा पराभव केला होता. यावेळी या मतदारंसघात 240743 इतकं मतदान झालं आहे.  

पाटण विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. पाटणमध्ये शिवसेनेकडून शंभूराज देसाई, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून हर्षद कदम आणि अपक्ष सत्यजितसिंह पाटणकर रिंगणात आहेत. विधानसभेला इथं 229483 मतदान झालं आहे.  

सातारा विधानसभा मतदारसंघात शिवेंद्रराजे भोसले भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. तर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अमित कदम विधानसभेच्या रिंगणात आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी 217700 इतकं मतदान झालं आहे.   

सातारा जिल्ह्यातील 2019 मधील विजयी उमेदवारांची नावं :

फलटण : दीपक चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस)
वाई : मकरंद पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
कोरेगाव: महेश शिंदे (शिवसेना) 
माण : जयकुमार गोरे (भाजप)
कराड उत्तर : बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
कराड दक्षिण : पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस)
पाटण : शंभूराज देसाई (शिवसेना)
सातारा :शिवेंद्रराजे भोसले (भाजप)

Disclaimer: निवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. विजयी उमेदवारांची यादी अपडेट होत आहे. त्यानुसार बातमी रिफ्रेश करा.

इतर बातम्या:

Mumbai Suburban District Vidhan Sabha Election Results 2024: मुंबई उपनगरातील 26 मतदारसंघांच्या निकालाचे लाईव्ह अपडेटस् पाहा एका क्लिकवर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indian Immigrants Around The World : गेल्या पाच वर्षात तब्बल साडे आठ लाख भारतीयांचा देशाला अखेरचा रामराम! अमेरिकेत आता नाकाबंदी, मग कोणत्या देशांना प्राधान्य देत आहेत?
गेल्या पाच वर्षात तब्बल साडे आठ लाख भारतीयांचा देशाला अखेरचा रामराम! अमेरिकेत आता नाकाबंदी, मग कोणत्या देशांना प्राधान्य देत आहेत?
Ladki Bahin Yojana : सरकारनं शब्द पाळला, लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात,पहिल्या दिवशी किती महिलांना लाभ?
बँक खातं चेक करा, लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात,पहिल्या दिवशी किती महिलांना लाभ?
Bhandara Ordance Factory Blast : भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी स्फोटाच्या चौकशीसाठी SIT स्थापन; 9 सदस्यीय समिती करणार दुर्घटनेची चौकशी
भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी स्फोटाच्या चौकशीसाठी SIT स्थापन; 9 सदस्यीय समिती करणार दुर्घटनेची चौकशी
Girish Mahajan : आपल्याकडे 33 कोटी देव...; पालकमंत्रिपदावरून प्रश्न विचारताच गिरीश महाजनांच्या उत्तरानं भुवया उंचावल्या!
आपल्याकडे 33 कोटी देव...; पालकमंत्रिपदावरून प्रश्न विचारताच गिरीश महाजनांच्या उत्तरानं भुवया उंचावल्या!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 25 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सSaif Ali khan Accused Blood Sample : सैफच्या रक्ताचे नमुने आणि कपड्यांवरील रक्ताचे डाग जुळवून पाहणारABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 25 January 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्सTahawwur Rana Extradition : 26/11 हल्ल्याचा कट उलगडणार, तहव्वूर राणाचा ताबा भारताकडे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indian Immigrants Around The World : गेल्या पाच वर्षात तब्बल साडे आठ लाख भारतीयांचा देशाला अखेरचा रामराम! अमेरिकेत आता नाकाबंदी, मग कोणत्या देशांना प्राधान्य देत आहेत?
गेल्या पाच वर्षात तब्बल साडे आठ लाख भारतीयांचा देशाला अखेरचा रामराम! अमेरिकेत आता नाकाबंदी, मग कोणत्या देशांना प्राधान्य देत आहेत?
Ladki Bahin Yojana : सरकारनं शब्द पाळला, लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात,पहिल्या दिवशी किती महिलांना लाभ?
बँक खातं चेक करा, लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात,पहिल्या दिवशी किती महिलांना लाभ?
Bhandara Ordance Factory Blast : भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी स्फोटाच्या चौकशीसाठी SIT स्थापन; 9 सदस्यीय समिती करणार दुर्घटनेची चौकशी
भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी स्फोटाच्या चौकशीसाठी SIT स्थापन; 9 सदस्यीय समिती करणार दुर्घटनेची चौकशी
Girish Mahajan : आपल्याकडे 33 कोटी देव...; पालकमंत्रिपदावरून प्रश्न विचारताच गिरीश महाजनांच्या उत्तरानं भुवया उंचावल्या!
आपल्याकडे 33 कोटी देव...; पालकमंत्रिपदावरून प्रश्न विचारताच गिरीश महाजनांच्या उत्तरानं भुवया उंचावल्या!
Jayant Patil: दावोसची गुंतवणूक PR Activity नसावी म्हणजे झालं! जयंत पाटलांनी सरकारला डिवचले, म्हणाले, 'मोठ्या मोठ्या वल्गना..'
दावोसची गुंतवणूक PR Activity नसावी म्हणजे झालं! जयंत पाटलांनी सरकारला डिवचले, म्हणाले, 'मोठ्या मोठ्या वल्गना..'
Ajit Pawar: आम्हीदेखील शेतकरी.... शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतच्या वक्तव्यावर अजित पवारांचं स्पष्टीकरण, म्हणाले..
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतच्या वक्तव्यावर अजित पवारांचं स्पष्टीकरण, म्हणाले..
Tahawwur Rana : मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण करण्यास मंजुरी; अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण करण्यास मंजुरी; अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
'या' 17 धार्मिक शहरांमधील दारूची दुकाने पूर्णपणे बंद होणार; इतरत्र हलवण्यास सुद्धा परवानगी नाहीच!
'या' 17 धार्मिक शहरांमधील दारूची दुकाने पूर्णपणे बंद होणार; इतरत्र हलवण्यास सुद्धा परवानगी नाहीच!
Embed widget