एक्स्प्लोर

Sarita Mhaske : फुटली नाही, मी नवस फेडायला देवदर्शनाला गेले होते; 'नॉट रिचेबल' सरिता म्हस्के पुन्हा ठाकरेंच्या कव्हरेजमध्ये

BMC Election : मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटल्याच्या बातम्या समोर आल्यानतंर खुद्द सरिता म्हस्के यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. वरिष्ठांच्या आदेशानुसारच आपण फोन बंद ठेवल्याची माहिती त्यांनी दिली.

मुंबई : निवडून आल्यानंतर नॉट रिचेबल असलेल्या नवनिर्वाचित नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के (Sarita Mhaske) हा पुन्हा एकदा ठाकरेंच्या संपर्कात आल्या आहेत. आपण ठाकरे गटातच असून इतर कुणाच्याही संपर्कात नसल्याचं त्या म्हणाल्या. निवडणुकीपूर्वी नवस बोलला होता, तो फेडण्यासाठी आपण तुळजापूरला देवदर्शनासाठी गेले असल्याची माहिती सरिता म्हस्के यांनी दिली. तसेच सर्व माध्यमांमध्ये आपलेच नाव झळकत होते, त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार फोन बंद केला होता अशी माहितीही त्यांनी दिली. 

ठाकरेंच्या शिवसेनेच्या गट नोंदणीवेळी अनुपस्थित असलेल्या नवनिर्वाचित नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के मध्यरात्री पुन्हा पक्षाच्या संपर्कात आल्या आहेत. त्यांनी मिलिंद नार्वेकरांची भेट घेतली आणि नंतर त्यांच्यासोबत कोकण भवनला जाऊन नोंदणीही केली. मुंबईतील प्रभाग 157 मधून डॉ. सरिता म्हस्के ठाकरेंच्या शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आल्या होत्या. मात्र त्यानंतर त्या नॉट रिचेबल झाल्याने शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू झाली होती.

Sarita Mhaske Mumbai : वरिष्ठांच्या आदेशानंतर फोन बंद

डॉ. सरिता म्हस्के म्हणाल्या की, "मी तुळजापूरला देवदर्शनाला गेले होते, माझा नवस होता. काल कोकण भवनमध्ये येण्याचा मेसेज उशीरा आला. त्यामुळे मला कल्पना नव्हती, मी निघून गेले होते. जेव्हा आम्हाला ही बातमी समजली त्यावेळी आम्ही मिलिंद नार्वेकर यांच्या संपर्कात होतो. वरिष्ठांनी आम्हाला आमचे फोन बंद करायला सांगितले होते. तुम्हाला ट्रेस केले जाईल, तुम्ही आमच्यापर्यंत येत नाही तोवर फोन बंद ठेवा असे आदेश होते."

सरिता म्हस्के या म्हणाल्या की, "तुळजापूरला गेले होते, विरोधक आमच्या मागे असतात, म्हणून वरिष्ठांनी आमच्या सुरक्षेसाठी फोन बंद करायला सांगितलं होतं. मुंबईत आल्यानंतर आम्ही नार्वेकरांच्या घरी गेलो, तिथेच राहिलो. , अजूनही आम्हाला मोबाईल सुरू करण्याची परवानगी नाही. कोकण भवनमध्ये जाऊन नोंदणी केली, आता मी संपर्कात असेल."

Sarita Mhaske BMC Election News : बदनामीसाठी विरोधकांचा डाव

आपण जिंकून आल्यानंतर विरोधकांकडून आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप सरिता म्हस्के यांनी केला. सर्वच नगरसेवक महत्त्वाचे, दोन दिवसांपूर्वी मेसेज असता तर मी कालच नोंदणी करायला आले असते. पक्षाला आमच्यावर विश्वास आहे. दुसऱ्या पक्षाकडून कोणताही संपर्क झाला नाही असं त्या म्हणाल्या.

मी तीन वर्षे शिंदे गटात होते, युतीच्या सरकारमुळे सीट भाजपकडे गेली. मी मेहनत घेतली होती, उद्धव ठाकरे यांनी माझी मेहनत पाहिली होती. त्यांना माहीत होतं ही विनिंग सीट आहे. त्यामुळे त्यांनी मला संपर्क केला आणि शेवटच्या दिवशी मला AB फॉर्म मिळाला असं सरिता म्हस्के म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
Bankipur By Election Result: नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, राजदच्या मित्रपक्षाकडून प्रशात किशोर यांना विजयापूर्वीच शुभेच्छा
नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, प्रशांत किशोर यांना निकालापूर्वीच राजदच्या मित्रपक्षाच्या शुभेच्छा

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
Embed widget