एक्स्प्लोर

बहीण प्रिया दत्तच्या प्रचारासाठी संजय दत्त मैदानात उतरणार

सध्या प्रिया दत्त यांचा प्रचार हा लहान मोठ्या बैठका, डोर टू डोर प्रचार अशा पद्धतीने सुरु आहे. आता त्याच्या मदतीला भाऊ संजय दत्त येणार आहे. सोमवारपासून संजय दत्त यांच्या रोड शोला होणार सुरुवात करणार आहे.

मुंबई : उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात काँग्रेसच्या प्रिया दत्त आणि भाजपच्या पूनम महाजन यांच्यात सामना रंगला आहे. दोन्ही उमेदवारांचा आपापल्या पद्धतीने जोरदार प्रचार सुरु आहे. आता प्रिया दत्त यांच्या प्रचारासाठी त्यांचा भाऊ अभिनेता संजय दत्त  मैदानात उतरणार आहे. अभिनेता संजय दत्त आता प्रिया दत्त यांच्यासाठी रोड शो करणार आहे. संजय दत्त सहा विधान सभा मतदारसंघात प्रिया दत्तसाठी रोड शो करणार आहे. सध्या प्रिया दत्त यांचा प्रचार हा लहान मोठ्या बैठका, डोर टू डोर प्रचार अशा पद्धतीने सुरु आहे. आता त्याच्या मदतीला भाऊ संजय दत्त येणार आहे. सोमवारपासून संजय दत्त यांच्या रोड शोला होणार सुरुवात करणार आहे. मुंबईतील उत्तर मध्य मुंबई या मतदार संघात भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांना काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त टक्कर देणार आहेत. गेल्यावेळी प्रिया दत्त यांना पूनम महाजन यांनी पराभूत केल्यामुळे त्यांच्याकडे पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे. सुरुवातीला प्रिया दत्त यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. मात्र पक्षातील दिग्गज नेते आणि कार्यकर्त्यांच्या मनधरणीनंतर प्रिया दत्तही पुन्हा लोकसभेच्या रिंगणात उतरण्यास तयार झाल्या आहेत. प्रिया दत्त या दिवंगत अभिनेते आणि काँग्रेस नेते सुनिल दत्त यांची कन्या. सुनिल दत्त यांच्या मृत्यूनंतर 2009 मध्ये प्रिया दत्त यांनी उत्तर मध्य मुंबईच्याच जागेवरुन खासदारकी मिळवली होती. 2014 च्या निवडणुकीत मात्र भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांनी प्रिया दत्त यांचा 1.86 लाख मतांनी पराभव केला होता. त्यामुळे आपला मतदारसंघ पुन्हा काबीज करण्यासाठी प्रिया दत्त पुन्हा कंबर कसतील. प्रिया दत्त यांची वार्षिक कमाई 13.13 कोटी रुपये इतकी आहे. 2014 साली शपथपत्रात त्यांनी त्यांची वार्षिक कमाई 56.86 लाख असल्याचे सांगितले होते. 2014 साली दत्त यांच्याकडे 3.19 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता होती. त्यामध्ये वाढ होऊन आता त्यांच्याकडे 17.84 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर दत्त यांच्याकडे 60.3 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता होती, ती वाढून आता 69.77 कोटी रुपये झाली आहे. प्रिया दत्त या मुंबईतल्या सर्वात श्रीमंत उमेदवार ठरल्या आहेत. संबंधित बातम्या

पूनम महाजन आणि प्रिया दत्त यांची संपत्ती किती?

गडकरी वि. पटोले, पूनम महाजन वि. प्रिया दत्त, महाराष्ट्रातील बिग फाईट्स

लोकसभा लढवण्यास प्रिया दत्त तयार, पूनम महाजनांकडून पराभवाचा वचपा काढणार?

VIDEO | उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांचा अर्ज दाखल | मुंबई | एबीपी माझा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aditi Tatkare on Ladki Bahin : लाडक्या बहिणींचे पैसे माघारी जाणार? जाणून घ्या एक-एक डिटेलAjit Pawar : राष्ट्रवादीचं अधिवेशन, अजित पवारांचं मोठं वक्तव्य... म्हणाले...Praful Patel Shirdi :  धनंजय मुंडेंचा राजीनामा ते भुजबळांची नाराजी; प्रफुल पटेल भरभरुन बोललेNana Patole PC : 'मुंबईत सेलिब्रिटी सुरक्षित नाही,  गावात सरपंच सुरक्षित नाही' : नाना पटोले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Chhagan Bhujbal : पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Embed widget