Ramtek Vidhan Sabha Election 2024 : नागपूर आणि चंद्रपूरनंतर देशाला पंतप्रधान मिळवून देणारा मतदारसंघ अशी रामटेक लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे यंदा देखील याच रामटेकच्या (Ramtek Assembly Constituency)जागेवरून मविआ आणि महायुतीमध्ये चांगलेच घमासान झाल्याचे बघायला मिळाले आहे. रामटेक विधानसभा मतदारसंघ (Ramtek Assembly Constituency) हा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेसाठी महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) सोडला होता. ठाकरेंच्या शिवसेनेने विशाल बरबटे (Vishal Barbate) यांना उमेदवारी दिली आहे. तर महायुतीकडून आमदार आशिष जयस्वाल (Ashish Jaiswal) निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

मात्र, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक (Rajendra Mulak) यांनी या मतदारसंघात बंडखोरी केल्याने आणि त्यांना काँग्रेसच्या नेत्यांचाही छुपा पाठिंबा असल्याने महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रभु श्रीरामच्या पावन पदस्पर्शानं पुनीत झालेल्या रामटेकचा 'गड' कोण सर करणार याकडं नागपूरचं नाही तर राज्याचं लक्ष लागलय.  

तरंगी लढतीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

गेल्या लोकसभेत रामटेक गडावरही महायुतीला अपयश आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांचा दारुण पराभव झाला आहे. तर रामटेकच्या जागेवरून  लोकसभेप्रमाणे विधानसभेतही जोरदार रस्सीखेच झाल्याचे बघायला मिळाली. त्यामुळं ठाकरेंच्या शिवसेनेचे विशाल बरबटे, महायुतीकडून आमदार आशिष जयस्वाल तर काँग्रेसचे पूर्व जिल्हाध्यक्ष आणि बंडखोरी मुळे निलंबित अपक्ष उमेदवार राजेंद्र मुळक यांच्यातील तिरंगी लढतीत रामटेक विधानसभेचा गड कोण राखणार? हे पाहणे अतिशय महत्वाचे ठरणार आहे. 

 

रामटेक लोकसभा निकाल 2024 (Ramtek Lok Sabha Election Result 2024) 

उमेदवार पक्ष मतं  
शामकुमार बर्वे काँग्रेस ६,१३,०२५ विजयी 
राजू पारवे शिवसेना शिंदे गट ५,३५,२५७ पराजय 

2019 सालचा निवडणूक निकाल - (Ramtek Lok Sabha Constituency 2019 Result)

कृपाल बालाजी तुमाने (शिवसेना) - 5,97,126 मतं - विजयी


किशोर उत्तमराव गजभिये (काँग्रेस) - 4,70,343 मतं

उदयसिंह यादव (काँग्रेस) : ३२,४९७ मतं

रामटेक विधानसभेचा इतिहास :

१९६२ साली पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक झाली. ज्यामध्ये काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला होता. मोहम्मद अब्दुल्ला खान पठाण हे विधानसभेचे पहिले आमदार झाले होते. तर १९६२ ते १९८० पर्यंत येथे काँग्रेसचेच उमेदवार विजयी झाले होते. १९८५च्या निवडणुकीत पहिल्यांदा जनता पक्षाचा उमेदवार येथून विजय झाला होता. त्यानंतर १९९० मध्ये जनता दलानं येथून निवडणूक जिंकली होती. तर १९९१ मध्ये पुन्हा काँग्रेसनं रामटेकची जागा जिंकली होती. मात्र, हा विजय त्यांचा अखेरचा विजय ठरला. १९९५ ते २०१४ पर्यंत येथे शिवसेनेचे उमेदवार विजयी होत आले. २०१४ मध्ये शिवसेना आणि भाजपाची युती तुटल्यानंतर भाजपानं पहिल्यांदाच रामटेकची निवडणूक जिंकली होती. मात्र २०१९ मध्ये ही जागा राखण्यात पक्षाला यश आलं नाही. २०१९ साली अपक्ष उमेदवार आशिष जयस्वाल यांनी रामटेक येथून विजय मिळवला होता.

हे ही वाचा