एक्स्प्लोर

Ramtek Vidhan Sabha 2024 : रामटेकच्या गडावर अखेर शिंदेंच्या शिवसेनेचा भगवा! काँग्रेसच्या बंडखोरीमुळे मविआला फटका?

Ramtek : ठाकरेंच्या शिवसेनेचे विशाल बरबटे, महायुतीकडून आशिष जयस्वाल तर अपक्ष उमेदवार राजेंद्र मुळक यांच्यातील तिरंगी लढतीत रामटेक विधानसभेचा गड कोण राखणार? हे पाहणे अतिशय महत्वाचे ठरणार आहे. 

Ramtek Vidhan Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत आलेले अपयश बाजूला सारुन महायुतीने विधानसभा निवडणुकीत मोठा राजकीय चमत्कार करुन दाखवला आहे. विशेष म्हणजे गेल्या लोकसभेत भाजप आणि महायुतीला विदर्भात दारुण पराभवाला समोर जावे लागले होते. त्यात रामटेकचा देखील समावेश होता. दरम्यान, संपूर्ण राज्यात गाजलेल्या रामटेकच्या सांगली पॅटर्नचा महाविकास आघाडीलाच जोरदार फटका बसला आहे. रामटेक मधून महायुती आणि शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार आशिष जयस्वाल विजयी झाले आहे. तर महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार विशाल बरबटे यांना 5000 मतही मिळाली नाहीये. तर काँग्रेसकडून शिवसेना ठाकरे गटाने उमेदवारी हिसकावून तर घेतली, मात्र जनतेचा पाठिंबा मिळवण्यात त्यांना अपयश आल्याचे चित्र आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस बंडखोराच्या भांडणात शिवसेना शिंदे गटाचे आशिष जयस्वाल विजयी झाली आहे.

काँग्रेसच्या बंडखोरीमुळे मविआला फटका?

नागपूर आणि चंद्रपूरनंतर देशाला पंतप्रधान मिळवून देणारा मतदारसंघ अशी रामटेक लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे यंदा देखील याच रामटेकच्या (Ramtek Assembly Constituency)जागेवरून मविआ आणि महायुतीमध्ये चांगलेच घमासान झाल्याचे बघायला मिळाले आहे. रामटेक विधानसभा मतदारसंघ (Ramtek Assembly Constituency) हा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेसाठी महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) सोडला होता. ठाकरेंच्या शिवसेनेने विशाल बरबटे (Vishal Barbate) यांना उमेदवारी दिली आहे. तर महायुतीकडून आमदार आशिष जयस्वाल (Ashish Jaiswal) निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

मात्र, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक (Rajendra Mulak) यांनी या मतदारसंघात बंडखोरी केल्याने आणि त्यांना काँग्रेसच्या नेत्यांचाही छुपा पाठिंबा असल्याने महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रभु श्रीरामच्या पावन पदस्पर्शानं पुनीत झालेल्या रामटेकचा 'गड' कोण सर करणार याकडं नागपूरचं नाही तर राज्याचं लक्ष लागले होते. मात्र यात शिवसेना शिंदे गटाचे आशिष जयस्वाल विजयी झाली आहे.

तरंगी लढतीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

गेल्या लोकसभेत रामटेक गडावरही महायुतीला अपयश आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांचा दारुण पराभव झाला आहे. तर रामटेकच्या जागेवरून  लोकसभेप्रमाणे विधानसभेतही जोरदार रस्सीखेच झाल्याचे बघायला मिळाली. त्यामुळं ठाकरेंच्या शिवसेनेचे विशाल बरबटे, महायुतीकडून आमदार आशिष जयस्वाल तर काँग्रेसचे पूर्व जिल्हाध्यक्ष आणि बंडखोरी मुळे निलंबित अपक्ष उमेदवार राजेंद्र मुळक यांच्यातील तिरंगी लढतीत रामटेक विधानसभेचा गड कोण राखणार? हे पाहणे अतिशय महत्वाचे ठरणार आहे. 

 

रामटेक लोकसभा निकाल 2024 (Ramtek Lok Sabha Election Result 2024) 

उमेदवार पक्ष मतं  
शामकुमार बर्वे काँग्रेस ६,१३,०२५ विजयी 
राजू पारवे शिवसेना शिंदे गट ५,३५,२५७ पराजय 

2019 सालचा निवडणूक निकाल - (Ramtek Lok Sabha Constituency 2019 Result)

कृपाल बालाजी तुमाने (शिवसेना) - 5,97,126 मतं - विजयी


किशोर उत्तमराव गजभिये (काँग्रेस) - 4,70,343 मतं

उदयसिंह यादव (काँग्रेस) : ३२,४९७ मतं

रामटेक विधानसभेचा इतिहास :

१९६२ साली पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक झाली. ज्यामध्ये काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला होता. मोहम्मद अब्दुल्ला खान पठाण हे विधानसभेचे पहिले आमदार झाले होते. तर १९६२ ते १९८० पर्यंत येथे काँग्रेसचेच उमेदवार विजयी झाले होते. १९८५च्या निवडणुकीत पहिल्यांदा जनता पक्षाचा उमेदवार येथून विजय झाला होता. त्यानंतर १९९० मध्ये जनता दलानं येथून निवडणूक जिंकली होती. तर १९९१ मध्ये पुन्हा काँग्रेसनं रामटेकची जागा जिंकली होती. मात्र, हा विजय त्यांचा अखेरचा विजय ठरला. १९९५ ते २०१४ पर्यंत येथे शिवसेनेचे उमेदवार विजयी होत आले. २०१४ मध्ये शिवसेना आणि भाजपाची युती तुटल्यानंतर भाजपानं पहिल्यांदाच रामटेकची निवडणूक जिंकली होती. मात्र २०१९ मध्ये ही जागा राखण्यात पक्षाला यश आलं नाही. २०१९ साली अपक्ष उमेदवार आशिष जयस्वाल यांनी रामटेक येथून विजय मिळवला होता.

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shirish Maharaj Death: शिरीष महाराज मोरेंनी सुसाईड नोटमध्ये उल्लेख केलेलं 32 लाखांचं कर्ज एकनाथ शिंदेंनी फेडलं
एकनाथ शिंदेंनी शिरीष महाराज मोरेंचं 32 लाखांचं कर्ज झटक्यात फेडून टाकलं
CM Devendra Fadnavis Meet Raj Thackeray : देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थवर
CM Devendra Fadnavis Meet Raj Thackeray : देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थवर
Pune: तिकडे देवाभाऊंशी राज ठाकरेंची भेट, पुण्यात राज- उद्धव भावांनी एकत्र येण्यासाठी बॅनरबाजी, चर्चेला उधाण
तिकडे देवाभाऊंशी राज ठाकरेंची भेट, पुण्यात राज- उद्धव भावांनी एकत्र येण्यासाठी बॅनरबाजी, चर्चेला उधाण
Shrikant Shinde : मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंचं 78 नव्या आमदारांना जेवणाचं निमंत्रण, ठाकरेंचे 10, पवारांचे 4 आमदार उपस्थित राहणार?
श्रीकांत शिंदेंचं 78 नव्या आमदारांना जेवणाचं निमंत्रण, ठाकरेंचे 10, पवारांचे 4 आमदार उपस्थित राहणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Thackeray भाजपच्या कोट्यातून आमदार? Devendra Fadanvis - Raj Thackeray भेटीत काय-काय ठरलं?CM Devendra Fadnavis Meet Raj Thackeray : देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थवरABP Majha Headlines | 10 AM | एबीपी माझा हेडलाईन्स | 10 Feb 2025 | Maharashtra NewsCM Devendra Fadnavis Meet Raj Thackeray : मुख्यमंत्री फडणवीस 'शिवतीर्थ'वर राज ठाकरे यांच्या भेटीला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shirish Maharaj Death: शिरीष महाराज मोरेंनी सुसाईड नोटमध्ये उल्लेख केलेलं 32 लाखांचं कर्ज एकनाथ शिंदेंनी फेडलं
एकनाथ शिंदेंनी शिरीष महाराज मोरेंचं 32 लाखांचं कर्ज झटक्यात फेडून टाकलं
CM Devendra Fadnavis Meet Raj Thackeray : देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थवर
CM Devendra Fadnavis Meet Raj Thackeray : देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थवर
Pune: तिकडे देवाभाऊंशी राज ठाकरेंची भेट, पुण्यात राज- उद्धव भावांनी एकत्र येण्यासाठी बॅनरबाजी, चर्चेला उधाण
तिकडे देवाभाऊंशी राज ठाकरेंची भेट, पुण्यात राज- उद्धव भावांनी एकत्र येण्यासाठी बॅनरबाजी, चर्चेला उधाण
Shrikant Shinde : मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंचं 78 नव्या आमदारांना जेवणाचं निमंत्रण, ठाकरेंचे 10, पवारांचे 4 आमदार उपस्थित राहणार?
श्रीकांत शिंदेंचं 78 नव्या आमदारांना जेवणाचं निमंत्रण, ठाकरेंचे 10, पवारांचे 4 आमदार उपस्थित राहणार?
Pune Temperature: देशात सर्वाधिक तापलेल्या शहरांच्या यादीत पुण्याचा समावेश;  शहराच सरासरी तापमान 35 अंशावर
देशात सर्वाधिक तापलेल्या शहरांच्या यादीत पुण्याचा समावेश; शहराच सरासरी तापमान 35 अंशावर
Pankaja Munde: गोपीनाथ मुंडे साहेबांवर प्रेम असणारे एकत्र गोळा झाले तर वेगळा पक्ष उभा राहील; पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
मुंडे साहेबांवर प्रेम असणारे एकत्र गोळा झाले तर वेगळा पक्ष उभा राहील; पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
नवी दिल्लीत 25 आमदारांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला, भाजपचा 100 टक्के स्ट्राईक रेट, 6 आमदार पुन्हा विधानसभेत
आम आदमी पार्टीनं 36 आमदारांना विधानसभेला उतरवलं, 22 जणांना मतदारांनी नाकारलं, नवी दिल्लीत काय काय घडलं?
शोएब अख्तर अंगावर धावून आला, हरभजन सिंगनेही उचलली बॅट अन्...; मैदानात काय घडलं?, VIDEO आला समोर
शोएब अख्तर अंगावर धावून आला, हरभजन सिंगनेही उचलली बॅट अन्...; मैदानात काय घडलं?, VIDEO आला समोर
Embed widget