एक्स्प्लोर

Rajya Sabha Election 2022 : तुम्ही फक्त मी सांगतो तसं मतदान करा, भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून येतील

Devendra Fadanvis : भाजपचा तिसरा उमेदवार निवडून येईल याचे सर्व नियोजन आम्ही केले आहे असं राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मुंबई: मी जसं सांगतोय, तुम्ही फक्त तसं मतदान करा, आपला तिसरा उमेदवार निवडून येईल अशा सूचना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) भाजप आमदारांना केल्या आहेत. आपलं मत बाद होणार नाही याची काळजी घेण्याची सूचनाही त्यांनी केली. राज्यसभेच्या निवडणुकीच्या (Rajya Sabha Election 2022) पार्श्वभूमीवर भाजप आमदारांची आज ताज प्रेसिडेन्सीमध्ये बैठक झाली. त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी आमदारांना मार्गदर्शन केलं. 

देवेंद्र फडणवीस आमदारांना संबोधित करताना म्हणाले की, "तुम्ही फक्त मी सांगतोय तसं  मतदान करा. भाजपचा तिसरा उमेदवार निवडून येईल याचे सर्व नियोजन आम्ही केले आहे. भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून येतील, तुम्ही फक्त तुमचे मत बाद होणार नाही याची काळजी घ्या."

शुक्रवारी राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान होणार असून सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये थेट लढत होणार आहे. शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक एकमेकांसमोर उभे असून एक-एक मत हे महत्त्वाचं आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपच्या आमदारांची आज ताज प्रेसिडेन्सीमध्ये बैठक झाली. राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान कशा प्रकारे करायचे याचे मार्गदर्शन करण्यात आलं. यामध्ये सुरुवातीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आमदारांना संबोधित केलं. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना मार्गदर्शन केलं. 

संख्याबळानुसार काय स्थिती?
राज्यसभेतील निवडणुकीसाठी विधानसभेतील आमदार मतदान करतात. सध्या असलेल्या विधानसभा आमदारांच्या संख्याबळानुसार, भाजपचे दोन उमेदवार सहज विजयी होऊ शकतात. तर, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा प्रत्येकी एक उमेदवार सहज विजयी होऊ शकतो. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेले अतिरिक्त मते आणि महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांच्या बळावर शिवसेना सहावी जागा जिंकण्याच्या प्रयत्नात आहे. तर, भाजपला देखील सहावी जागा जिंकण्यासाठी 13  च्या आसपास मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे ही निवडणूक अटीतटींची होणार असल्याचे म्हटलं जात आहे. शुक्रवारी ही निवडणूक होणार आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

पुणे शिक्षक आणि पदवीधर निवडणूक, शरद पवारांच्या आमदाराचा भाजपला पाठिंबा, चंद्रकांत पाटील आणि जयकुमार गोरेंसोबत व्यासपीठावर उपस्थित
पुणे शिक्षक आणि पदवीधर निवडणूक, शरद पवारांच्या आमदाराचा भाजपला पाठिंबा, चंद्रकांत पाटील आणि जयकुमार गोरेंसोबत व्यासपीठावर उपस्थित
Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
अजितदादांचा आजचा पक्ष सक्षम नाही, पुणे पदवीधर जागा मिळायला हवी होती, रोहित पवारांचा टोला, तर अर्थमंत्रीपदावरुनही मुख्यमंत्र्यांवर टीका
अजितदादांचा आजचा पक्ष सक्षम नाही, पुणे पदवीधर जागा मिळायला हवी होती, रोहित पवारांचा टोला, तर अर्थमंत्रीपदावरुनही मुख्यमंत्र्यांवर टीका
Abhijit Bichukale : अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, पुणे पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघातून भरला अर्ज, म्हणाले 'माझी पत्नी शिक्षिका आहे, तिने...'
अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, पुणे पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघातून भरला अर्ज, म्हणाले 'माझी पत्नी शिक्षिका आहे, तिने...'

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
Tiger Shroff: बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका, सर्वाधिक फायदा 'या' कंपनीला
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
Satara News : कुरिअर कंपनीतून एकानं टीप दिली, पुणे बंगळुरु महामार्गावर दरोडा टाकत दीड कोटींचे सोने चांदीचे दागिने लुटले, पोलिसांनी 12 तासात 8 जणांना बेड्या ठोकल्या
पुणे बंगलोर महामार्गावर कवठे गावच्या हद्दीत दीड कोटींचा दरोडा, LCB नं तपासाची चक्र फिरवली, 12 तासात 8 जणांना बेड्या
Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
Embed widget