एक्स्प्लोर

Raj Thackeray: सोडून गेलेले गद्दार नव्हे, खरा गद्दार उद्धव ठाकरे; राज ठाकरे शिवडीत गरजले, सर्व बोलून गेले!

Raj Thackeray On Uddhav Thackeray: मनसेप्रमुख राज ठाकरे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.

Raj Thackeray On Uddhav Thackeray: सोडून गेलेले गद्दार नाही, तर खरा गद्दार उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आहे, असा घणाघात मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला. एका माणसाने सगळ्या पक्षाची वाट लावली. अनेकजण पक्ष सोडून गेले, त्यांना ते गद्दार बोलताय. खरा गद्दार तर घरात बसलाय, तुम्ही पक्षासोबत गद्दारी केली, असा हल्लाबोल राज ठाकरेंनी केला. शिवडीत बाळा नांदगावकर यांच्या प्रचारार्थ राज ठाकरेंनी आज जाहीर सभा घेतली. यावेळी ते बोलत होते. 

उद्धव ठाकरेंमुळे सगळे शिवसेनेतून बाहेर पडले. या माणसाच्या वागणुकीमुळे राणे बाहेर पडले, त्यांनंतर मी बाहेर पडलो आणि आता शिंदे, असं राज ठाकरेंनी सांगितले. ज्या छगन भुजबळांनी बाळासाहेब ठाकरेंना त्रास दिला, त्यांना उद्धव ठाकरेंनी घरी जेवायला बोलावलं, अशी टीकाही राज ठाकरेंनी केली. उद्धव म्हणजे खाष्ट सासूसारखा, ज्याला सोडून सगळ्या सुना गेल्या, असंही राज ठाकरेंनी सांगितलं. 

बाळासाहेब ठाकरेंना सोडून गेलेल्यांनी आम्हाला अक्कल शिकवू नये- अजय चौधरी

राज ठाकरेंच्या या टीकेला शिवडीमधील महाविकास आघाडीचे उमेदवार अजय चौधरी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरे यांच्याकडून वेगळी अपेक्षा काय करायची?, अनेकांच्या सुपार्‍या घेऊन राज ठाकरे काम करतात. गद्दार कोण आहे, पक्ष कोणी सोडला, बाळासाहेबांना कोणी सोडलं? उभ्या महाराष्ट्र जनतेला माहिती आहे, अशी टीका अजय चौधरी यांनी केली. राज ठाकरेंच्या या प्रतिक्रियेला आम्ही कवडीची किंमत देत नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरेंसोबत होतो, आहोत...जन्म बाळासाहेब ठाकरेंसोबत राहू...बाळासाहेब ठाकरेंना सोडून गेलेले यांनी आम्हाला अक्कल शिकू नये, असं प्रत्युत्तर अजय चौधरींनी दिलं आहे. 

राज ठाकरेंच्या टीकेवर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया-

राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना गद्दार म्हटल्यानंतर शिंदे गटाचे भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाऊच भावाला बोलतोय, याचा अर्थ त्यात काहीतरी तथ्य आहे. आम्ही बाळासाहेबांची शिवसेना घेऊन पुढे चाललो आहोत. आम्ही कुठल्याच पक्षात प्रवेश केला नाही.  मूळ शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह आमचं आम्हाला मिळालं. राज ठाकरे बोलले ते अगदी योग्य आहे. आम्ही केलेलं योग्य आहे. आमच्यावर जे शिंतोडे उडवत आहेत, त्यांना घरचा आहेर राज ठाकरे यांनी दिला आहे, अशी प्रतिक्रिया भरत गोगावले यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. 

संबंधित बातमी:

Raj Thackeray: राज ठाकरेंनी शेवटच्या प्रचारसभेत भाजप अन् शिवसेना शिंदे गटाचे मानले आभार; उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Embed widget